
बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी या जागाच निरोप घेतला. बॉलिवूड इंडस्ट्रीमधून त्यांची झालेली एक्झीट ही नक्कीच मनाला चटका देणारी आहे.अजूनही त्यांचे कुटुंब आणि चाहते त्यांच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नाहीयेत. दरम्यान धर्मेंद्रसोबत त्यांचे दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल हे दोघे देखील बॉलिवूडमध्ये सुपरस्टार आहेत. त्यांनी देखील इंडस्ट्रीला खूप चांगले चित्रपट दिले आहेत. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की सनी देओल आणि बॉबी देओल या दोन्ही अभिनेत्यांची नावे ही खऱ्या आयुष्यात वेगळी आहेत.
धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांची खरी नावे काय आहेत?
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांची खरी नावे त्यांच्या पडद्याच्या नावांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. या यादीत देओल कुटुंबातील धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांच्या नावाचाही समावेश आहे. धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल, ज्यांना जग या नावांनी ओळखते पण त्यांची खरी नावे वेगळी आहेत. ज्याबद्दल कदाचितच कोणाला माहित असेल.
चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव धर्मेंद्र झाले.
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केवल किशन सिंह देओल होते. धर्मेंद्र यांच्या नावाची प्रेरणा तेच होते. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंह देओल होते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या पालकांनी त्यांचे हे नाव ठेवले होते. चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव धर्मेंद्र झाले.
सनी आणि बॉबी देओलची खरी नावे काय आहेत?
त्याचप्रमाणे, धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलगे, सनी आणि बॉबी देओल यांचीही नावे वेगळी आहेत. चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांची नावे बदलली. सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल आहे. त्यांचे कुटुंब त्यांना प्रेमाने सनी म्हणते, पुढे सनी याच नावानाचे चित्रपटांमध्ये प्रवेश केला. आणि त्याच नावाने प्रसिद्धी मिळाली.
बॉबी देओलच्या बाबतीतही तेच झाले. त्याचे खरे नाव विजय सिंग देओल आहे आणि त्याला कुटुंबात प्रेमाने बॉबी म्हटले जाते. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यानेही आपले नाव न बदलता बॉबी हेच पुढे ठेवले आणि सनी देओलप्रमाणे त्यालाही त्याच नावाने चित्रपटात प्रचंड यश मिळालं.
दरम्यान धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवूडचा एक अख्खा काळ गेल्या सारखंच वाटलं. दरम्यान 3 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या अस्थींचे हरिद्वारमधील हर की पौडी येथे गंगेत विसर्जन करण्यात आले. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांना अंतिम निरोप देण्यात आला.