Bharti Singh : अचानक लघवी झाल्यासारखं वाटलं अन्… डिलिव्हरीच्या आधी प्रचंड घाबरली भारती, प्रेग्नंसीमधील ही लक्षणं समजून घ्या

Bharti Singh : डिलिव्हरीच्या आधी मध्यरात्री भारती हिच्यासोबत नक्की काय झालेलं, म्हणाली, ': अचानक लघवी झाल्यासारखं वाटलं अन्...', प्रेग्नंसीमधील ही लक्षणं समजून घ्या, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारती सिंह हिची चर्चा

Bharti Singh : अचानक लघवी झाल्यासारखं वाटलं अन्... डिलिव्हरीच्या आधी प्रचंड घाबरली भारती, प्रेग्नंसीमधील ही लक्षणं समजून घ्या
कॉमेडियन भारती सिंह
| Updated on: Dec 23, 2025 | 1:16 PM

Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया यांनी नुकताच दुसऱ्या मुलाचं जगात स्वागत केलं आहे. गोला याला भाऊ आल्यामुळे भारती आणि हर्ष यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. कुटुंबात एकीकडे आनंदाचं वातावरण असताना भारती हिने असे काही क्षण चाहत्यांसोबत शेअर केले, जे हैराण करणारे आहे.. भारतीने तिच्या प्रसूतीशी संबंधित एक क्षण शेअर केला आहे, जो ऐकून आई होणाऱ्या अनेक महिला स्वतःला त्याच्याशी जोडतील…

व्लॉगमध्ये भारती सिंग हिने सांगितल्यानुसार डिलिव्हरी आधी जेव्हा तिची पाण्याची पिशवी (वॉटर बॅग) फुटली, तेव्हा भारती प्रचंड घाबरलेली होती… तिला कळलं नाही की नक्की काय होत आहे आणि अशा वेळेत काय करायला हवं.. भारतीने त्या क्षणी तिची चिंता आणि अस्वस्थता अतिशय प्रामाणिकपणे व्यक्त केली, जी प्रत्येक गर्भवती महिलेसाठी परिचित भावना आहे.

व्लॉगमध्ये भारती म्हणाली, ‘गुड मॉर्निंग… सकाळी 6 वाजता अचानक सर्वकाही ओलं झालं होतं… डॉक्टरांना सांगितलं… तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की माझी पाण्याची पिशवी फुटली आहे… तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावं लागले… मला प्रचंड भीती वाटली… ‘

पुढे भारती म्हणाली, ‘मला रात्रभर थोडं विचित्रच वाटत होतं, आणि काय चाललं आहे ते मला समजत नव्हतं. सकाळी अचानक लघवी झाल्यासारखे वाटलं, ज्यामुळे माझे संपूर्ण बेडशीट आणि कपडे भिजले. मला त्याकाळात जेकाही वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे… असं देखील भारती म्हणाली.

प्रसुतीकाळ जवळ आला आणि पाण्याची पिशवी फुटली तर काय करावं?

– प्रसुतीकाळ जवळ आला आणि पाण्याची पिशवी फुटली तर सर्वात आधी तर घाबरु नका… शांत राहा…पाण्याची पिशवी फुटणं हे प्रसूती सुरू होण्याचं लक्षण असू शकतं.

– पाण्याची पिशवी फुटल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना सांगा. पाण्याची पिशवी कधी फुटली, किती पाणी निघालं आणि रंग कसा आहे… याबद्दल सर्व माहिती डॉक्टरांना सांगा…

– पाण्याची पिशवी फुटल्यास घरी थांबू नका. तात्काळ रुग्णालयात जा… रुग्णालयात वेळेवर पोहोचणं आई आणि बाळासाठी सुरक्षित असतं. अंघोळ करु नका… स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरा…

– बाळाच्या हालचालीवर देखील लक्षात ठेवा. बाळ हलत नसेल, ताप, रक्तस्राव किंवा तीव्र वेदना असतील तर ताबडतोब डॉक्टरांना सांगा… वेळ वाया घालवू नका…

– पाणी हिरवट / पिवळसर असेल, खूप रक्तस्राव होत असेल, बाळ हलत नसेल, तिव्र वेदना होत असतील तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधा…