Nana Patekar : कॅन्सरमुळे इरफान खान खूप आजारी होता, त्यावेळी भेटायला गेलेल्या नानांना त्याने सांगितलेलं, फक्त एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, मला..

Nana Patekar : इरफान खान आणि नाना पाटेकर हे दोन महान कलाकार आहेत. आज दोघेही या जगात नाहीत. इरफान खानचं काही वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झालं. त्यावेळी नाना पाटेकर त्याला त्याच्या मढ इथल्या घरी भेटायला गेले होते.

Nana Patekar : कॅन्सरमुळे इरफान खान खूप आजारी होता, त्यावेळी भेटायला गेलेल्या नानांना त्याने सांगितलेलं, फक्त एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, मला..
Irfan Khan-Nana Patekar
| Updated on: Oct 13, 2026 | 6:08 PM

मागच्या आठवड्यात 8 ऑक्टोंबरला नाना पाटेकर यांचं गोवा येथील राहत्या घरी निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. आता नानांच्या पश्चात त्याच्या मुलाखतीचे जुने व्हिडिओ, सहकाऱ्यांशी झालेल्या संवादाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये नाना पाटेकर दिग्दर्शक विशाल भारद्वाज सोबत संवाद साधताना दिसतायत. ते इरफान खानच्या विषयावर बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानचं निधन झालं. कॅन्सरशी एक दीर्घ झुंज दिल्यानंतर इरफान खान यांचं निधन झालं. इरफानचा विनम्र स्वभाव आणि दुर्मिळ असलेल्या गुणांबद्दल नाना कौतुकाने बोलत होता. “संजय लीला भन्साळीच्या ‘खामोशी’ चित्रपटाच्यावेळी इरफानची पत्नी सुतापाने स्क्रिप्ट सहाय्यक म्हणून काम केलेलं. त्यावेळी ती मला सांगायची की, नाना प्लीज इरफानचा नाव सूचवा. मी तिला बोललेलो एक दिवस इरफान आपलं नाव सुचवेल. तो खूप लवकर सोडून गेला. तो स्टार होता. पण ते स्टारपण त्याच्यात कधी दिसलं नाही” असं नाना पाटेकर म्हणाले.

विशाल भारद्वाजे यावेळी म्हणाले की, ‘ते एक दुर्मिळ व्यक्तीमत्व होतं’ “इरफान जेव्हा खूप आजारी होता, तेव्हा तो काय बोललेला हे सुद्धा नानाने सांगितलं. मी मढला त्याच्या घरी गेलेलो. तेव्हा तो खूप आजारी होता. तो मला म्हणाला मला रातराणीची फुलं खूप आवडतात. फक्त हे लक्षात ठेवा. मला कधीकधी असं वाटतं की, मढ मधल्या त्याच्या घरी रात राणीचं झाड लावावं” असं नाना त्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो. सुतापा सिकंदरने नानाबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली.

Loading...

इरफान खानच्या पत्नीने पोस्टमध्ये काय लिहिलय?

“मी माझा पहिला चित्रपट ‘खामोशी द म्युझिकल’ नानासोबत केलेला. तो खूप रागीट स्वभावाचा म्हणून ओळखला जायचा. माझ्या स्वतःच्या नजरेत तो एक नीतिमान माणूस आहे. त्याला माझ्यामध्ये काय आवडलं? हा प्रश्न मला नेहमी पडतो. माझ्याबाबतीत तो खूप दयाळू, प्रेमळ होता.आम्हाला दोघांना शहरात रहायला नाही आवडायचं. तो गावी गेला. माझाही तोच प्रयत्न आहे. आपण लवकरच भेटू. इरफान, तुम्ही आणि मी आपण तिघे मिळून चुकीच्या गोष्टींना शिव्या देऊ. पुढचं स्टेशन तुम्हाला समाधान देणारं असो ही माझी इच्छा आहे तुमच्यासाठी” असं सुतापा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us