देशातील टॉप मॉडेल, बोल्ड फोटोशूटमुळे सापडली वादात, 14 वर्षे कोर्टात होतं प्रकरण, फोटो पाहून व्हाल थक्क

कधी काळी देशातील टॉप मॉडेल होती ही सौंदर्य क्वीन. मिलिंद सोमनसोबत दिला असा बोल्ड लुक, ज्यामुळे उडालेला मोठा गोंधळ. एका रात्रीत झाली लोकप्रिय. पण अचानक झाली गायब. कोण आहे ही मॉडेल?

| Updated on: Jul 25, 2026 | 2:38 PM
1 / 5
भारतातील प्रसिद्ध सुपरमॉडेल आणि माजी मिस इंडिया मधू सप्रेचा जीवनप्रवास संघर्ष, यश आणि पुनरागमनाची प्रेरणादायी कहाणी आहे. तिला खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेतले आणि शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली.

2 / 5

मात्र, एका पार्टीत प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफरची तिच्यावर नजर पडली आणि तिला मॉडेलिंगची संधी मिळाली. एका जाहिरातीपासून सुरू झालेला प्रवास तिला देशातील आघाडीच्या सुपरमॉडेल्सच्या यादीत घेऊन गेला.

3 / 5

मिस इंडिया झाल्यानंतर मधू सप्रेची लोकप्रियता झपाट्याने वाढली. अनेक मोठ्या ब्रँड्सनी तिच्यासोबत काम केले आणि चित्रपटांच्या ऑफरही मिळाल्या. मात्र, 1995 मध्ये अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण यांच्यासोबत 'टफ शूज'साठी केलेल्या वादग्रस्त फोटोशूटमुळे तिच्या आयुष्यात मोठे वळण आले.

4 / 5

या छायाचित्रावर अश्लीलता आणि वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप झाले. हे प्रकरण तब्बल 14 वर्षे न्यायालयात चालले आणि अखेरीस दोघांचीही निर्दोष मुक्तता झाली.

5 / 5

या वादाचा परिणाम तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही झाला. काही चित्रपट प्रकल्प रखडले तर या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याच काळात मिलिंद सोमण यांच्यासोबतचे तिचे नातेही चर्चेत राहिले. दोघे विवाह करतील अशी चर्चा होती. मात्र विचारांतील मतभेदांमुळे त्यांचे नाते तुटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us