
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चित्रपटसृष्टीतील एखादी घटना असो किंवा देशातील इतर कुठले विषय, त्यावर राम गोपाल वर्मा हे त्यांची मतं मांडून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्यांनी सत्या, सरकार, रंगीला यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.


अभिनेत्री उर्मिला मातोंडकरशी त्यांचं अफेअर त्याकाळी खूप चर्चेत होतं. सत्या या चित्रपटात उर्मिलाने त्यांच्यासोबत काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी उर्मिलासोबत रंगीला हा चित्रपट बनवला. उर्मिलाच्या करिअरमधील हा खूप महत्त्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतरच दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

कलाविश्वात सुरु असलेल्या या अफेअरची चर्चा राम गोपाल वर्मा यांच्या घरापर्यंत पोहोचली. जेव्हा त्यांची पत्नी रत्ना यांना याबद्दल समजलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. संतापलेल्या रत्ना यांनी उर्मिलाच्या कानाखाली मारल्याचं म्हटलं जातं. तथापि, याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही किंवा उर्मिलाने कधीही राम गोपाल वर्मा यांच्याशी त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही.

असंही म्हटलं जातं की, उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या प्रेम प्रकरणातूनच पत्नी रत्ना यांनी घटस्फोट घेतला. परंतु, या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, याची खात्री देता येत नाही.