अपशब्द वापरला त्यावेळी मला थोबडायला हवं होतं, मानेंचा सहकलाकारांना सवाल

| Updated on: Jan 17, 2022 | 7:40 PM

किरण माने आपली प्रत्येक भूमिका फेसबुकच्या माध्यमातुन मांडत असल्याचे आपण पाहतोय.

अपशब्द वापरला त्यावेळी मला थोबडायला हवं होतं, मानेंचा सहकलाकारांना सवाल
Follow us on

मुंबई – स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका मुलगी झाली हो चा वाद सद्या एका वेगळ्याच वळणावर असल्याचे आपण पाहतोय. मुळात अचानक अभिनेते किरण माने यांना बाहेर रस्ता दाखवला असल्याचे मानेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला सांगितले. त्यानंतर मालिकेतील सहकलाकारांनी त्यांच्यावर गैरवर्तन आणि आणि अपशब्द वापरल्याचे मीडियाला सांगितले.

किरण मानेनी जेव्हा हे प्रकरण शरद पवार यांच्य़ापर्यंत नेले, तेव्हा मालिकेल्या निर्मात्यांनीही शरद पवारांची भेट घेतली. ज्यावेळी किरण माने यांच्या प्रकरणाची मीडियाने दखल घेतली, त्यावेळी किरण मानेच्या सहकलाकारांनी अपशब्द आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

किरण माने आपली प्रत्येक भूमिका फेसबुकच्या माध्यमातुन मांडत असल्याचे आपण पाहतोय. तसेच आज त्यांनी मी इतका वाईट वागलो हे सांगायला तुम्हाला इतके तास का लागले ? वेळीच पोलिसांकडे तक्रार का केली नाही ? माझ्या अशा वागण्याबद्दल तुम्ही माझं वेळीच का थोबाडं फोडलं नाही असा सवाल त्यांनी सहकलाकारांना केला आहे.

अनेकांनी फेसबुकवरती किरण मानेना सपोर्ट दर्शविला आहे, तसेच अनेकांनी किरण मानेंच्या नावाने पोस्ट करून हॅशटॅग सुध्दा चालवल्याचे पाहवयास मिळत आहेत. किरण मानेंनी फेसबुकवर केलेल्या पोस्टला 1.8 लाईक आले आहेत.

किरण माने प्रकरणावर राष्ट्रवादीचं ‘नो कॉमेंट’, प्रिया बेर्डे म्हणतात, मला समजायला मार्ग नाही!

किरण माने वादात आता रुपाली चाकणकरांची एन्ट्री, मालिकेच्या निर्मातीला खुलासा मागितला!

Fact Check: अभिनेते किरण मानेंनी खरंच फडणवीस, मोदींसाठी शिवराळ भाषा वापरली? काय आहे ‘नालायक’ पोस्टचं वास्तव