किरण माने प्रकरणावर राष्ट्रवादीचं ‘नो कॉमेंट’, प्रिया बेर्डे म्हणतात, मला समजायला मार्ग नाही!

किरण माने प्रकरणावर राष्ट्रवादीचं 'नो कॉमेंट', प्रिया बेर्डे म्हणतात, मला समजायला मार्ग नाही!
प्रिया बेर्डे. किरण माने, बाबासाहेब पाटील

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकारी आणि प्रिया बेर्डे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं की, 'मागच्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीत काम करतेय. मात्र मला असा अनुभव आलेला नाही. हे सगळं कळण्या पलिकडचं आहे.'

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 17, 2022 | 6:49 PM

आयेशा सय्यद, मुंबई : मागच्या काही दिवसात किरण माने  (kiran mane) आणि त्यांच्याभोवतीचा वाद आता चांगलाच पेटलाय. याबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही राजकीय प्रतिक्रियादेखील समोर येत आहेत. राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकारी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे (priya berde) यांनी म्हटले की, ‘हे सगळं जे सुरू आहे ते अनाकलनीय आहे. मीही या इंडस्ट्रीत काम करतेय. मात्र मला असा अनुभव आलेला नाही. मला यावर काहीही बोलायचं नाही’ तसंच राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (babsaheb patil) यांनीही अश्याच आशयाची प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिया बेर्डे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकारी आणि प्रिया बेर्डे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं की, ‘मागच्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीत काम करतेय. मात्र मला असा अनुभव आलेला नाही. राजकीय भूमिका घेतली म्हणून कुणाला मालिकेतून काढलं जात नाही. पण किरण माने यांचं म्हणणं जर खरं असेल आणि राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना काढून टाकण्यात आलं असेल तर ते योग्य नाही. जे जे होईल ते ते पहावे. हळूहळू गोष्टी समोर येतील.’

बाबासाहेब पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनीही प्रिया बेर्डेंशी सहमत असलेली प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीला किरण माने यांची बाजू खरी आहे, त्यांच्यावर अन्याय होतोय, असं वाटत होतं. मात्र हळूहळू गुंता वाढत गेला आणि आता नक्की कुणाचं म्हणणं खरं आहे हे कळत नाही. हळूहळू गोष्टी समोर येत आहेत. आता मला काहीही बोलायचं नाही. जेव्हा चित्र स्पष्ट होईल तेव्हाच बोलणं योग्य राहिल, असं बाबासाहेब पाटील म्हणाले.

नेमका वाद काय आहे?

स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित बातम्या

किरण माने वादात आता रुपाली चाकणकरांची एन्ट्री, मालिकेच्या निर्मातीला खुलासा मागितला!

Fact Check: अभिनेते किरण मानेंनी खरंच फडणवीस, मोदींसाठी शिवराळ भाषा वापरली? काय आहे ‘नालायक’ पोस्टचं वास्तव

आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच…किरण मानेंच्या नव्या पोस्टने खळबळ, वाचा काय म्हटले आहे नव्या पोस्टमध्ये!

किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें