Fact Check: अभिनेते किरण मानेंनी खरंच फडणवीस, मोदींसाठी शिवराळ भाषा वापरली? काय आहे ‘नालायक’ पोस्टचं वास्तव

Fact Check: अभिनेते किरण मानेंनी खरंच फडणवीस, मोदींसाठी शिवराळ भाषा वापरली? काय आहे 'नालायक' पोस्टचं वास्तव
किरण माने, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस

'मला ट्रोल केल्यानंतर मी ट्रोलर्सच्याच भाषेत मी त्यांना उत्तर देतो. पण ज्या शब्दांचा अर्थ वाईट नसेल अशा शब्दांचा वापर करून मी उत्तर देतो', असं किरण माने म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 17, 2022 | 3:17 PM

मुंबई: किरण माने ( kiran mane) यांच्या एका जुन्या कमेंटचा स्किनशॉट सध्या व्हायरल होतोय. यामध्ये किरण माने यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांबद्दल (devendra fadnvis) आक्षेपार्ह शब्द वापरल्याचं दिसतंय. या स्क्रिनशॉटचं नेमकं वास्तव काय आहे? ‘ती’ आक्षेपार्ह कमेंट किरण माने यांचीच आहे का? हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने किरण माने यांच्याशी संपर्क केला असता, ‘ही जुनी कमेंट आहे. नक्की कोणत्या पोस्टवर ही कमेंट केली होती ते आठवत नाही. मात्र ही कमेंट मी केलेली असावी. मी ते नाकारत नाही. पण मला ट्रोल केल्यानंतर मी ट्रोलर्सच्याच भाषेत मी त्यांना उत्तर देतो. पण ज्या शब्दांचा अर्थ वाईट नसेल अशा शब्दांचा वापर करून मी उत्तर देतो’, असं किरण माने म्हणाले.

किरण माने काय म्हणाले?

‘ज्यावेळी मला ट्रोलर्स मला उचकवतात तेव्हा मी त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देतो. मी ग्रामीण भागातून येतो. त्यामुळे ग्रामीण भागात वापरले जाणारे शब्द मी वापरतो. या पोस्टबद्दल बोलायचं झाल्यास, फक्त माझ्या कमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. पण त्याच्या आधी ट्रोलर्सने मला उचकवलं असेल. त्यानंतर मी त्यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिलं. कमेंटमध्ये वापरेल्या शब्दांचा अर्थ वाईट नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही विधानांशी मी सहमत नाही, त्यांची काही मतं मला पटत नाहीत. पण त्यांच्याबद्दल मी वाईट शब्द वापरले नाहीत. मी वापरलेल्या शब्दांचा अर्थ चुकीचा नाही. जिव्हारी लागतील अशा शब्दांचा मी वापर केला पण त्यांचा वाईट अर्थ नाही. ट्रोलर्सने मला ट्रोल केल्यामुळे मी ती कमेंट केली असावी, असं स्पष्टीकरण किरण माने यांनी दिलं आहे.

विश्वंभर चौधरी यांचं मत

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (vishwambhar chaudhari) यांनी हा स्किनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करत व्यक्तीस्वातंत्र्य आणि किरण माने यांचे आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केला आहे. या बद्दल टीव्ही 9 मराठीशी बोलताना चौधरी म्हणाले, ‘व्यक्तीस्वातंत्र्य मी मानतो. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी काही अपशब्द वापरत असेल तर ते चूकच आहे.’ किरण माने यांना मालिकेतून काढण्याबाबत ते म्हणाले, ‘जर एखादी राजकीय भूमिका घेतल्याने माने यांना मालिकेतून बाहेर काढलं असेल तर ते चूक आहे.’

व्हायरल पोस्ट

किरण माने यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरलेल्या कमेंटचा एक स्किनशॉट सध्या व्हायरल होतोय. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. किरण माने यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरलेले शब्द चुकीचे आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच…किरण मानेंच्या नव्या पोस्टने खळबळ, वाचा काय म्हटले आहे नव्या पोस्टमध्ये!

किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या

माझ्यावर आरोप करणाऱ्या महिला कलाकार भाजप आणि मनसेशी संबंधित, किरण माने यांचा नवा दावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें