किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या

'मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं', असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. 'किरण मानेचा बोलवता धनी कोण?', असा सवालही त्यांनी विचारला आहे.

किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या
चित्रा वाघ, किरण माने
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 12:01 PM

मुंबई : किरण माने (kiran mane) या नावाने मागच्या काही दिवसांपासून टीव्ही जगत व्यापून टाकलंय. या सगळ्या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp leader chitra wagh) यांनीही किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. सोबतच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendera modi) विखारी टिका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठिशी घालत आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

शिवसेनेची भूमिका काय? किरण माने यांची फेसबुक पोस्ट आणि त्यांना मालिकेतून काढून टाकल्याप्रकरणी आदेश बांदेकर यांना विचारलं असता, ते म्हणाले, “मागच्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसात मला असा कुठलाही अनुभव आलेला नाही. कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण माने यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते हे सगळं करत आहेत”, असं आदेश बांदेकर म्हणाले.

मनसेची भूमिका भूमिका?

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी, ‘मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिलाय. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं.’ किरण यांचा आरोप आहे की, ‘मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं.’ यावर ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल, असं खोपकर म्हणाले.

नेमका वाद काय आहे?

स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

किरण मानेंची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट काय आहे?

‘नाट्यगृहात एक किंवा दोन प्रेक्षक असल्याने घाबरुन कधी नाटकाचा प्रयोग रद्द केला नाही. हाऊस फुल्ल असल्यासारखं रेटून प्रयोग करूनच घरी आलो. दम हाय छातीत भावा!’, अशी फेसबुक पोस्ट किरण यांनी फेसबुकवर लिहिली. यात कुठेही एखाद्या राजकीय पक्षाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. मात्र या पोस्टचा अनेकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी संदर्भ जोडला. पंजाबमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक होतेय. याच निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये गेले. मात्र स्थानिक लोकांनी पंतप्रधानांच्या ताफ्याची अडवणूक केली. त्यावेळी पंजाबमधल्या एका उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा जवळजवळ 15 ते 20 अडकून पडला. पंतप्रधानांना इतका वेळ एकाच जागी थांबावं लागल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. याला पंजाबमधलं काँग्रेसचं सरकार जबाबदार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. हे सगळं पंजाबमध्ये घडत असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेला घेऊन देशभर प्रतिक्रिया उमटू लागल्या. याच दिवशी किरण माने यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिली. यानंतर ती पोस्ट पंतप्रधानांना उद्देशून लिहिल्याचा दावा करत माने यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र यात कुणा नेत्याचा किंवा पक्षाचा उल्लेख केला नसल्याचं माने यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या 

माझ्यावर आरोप करणाऱ्या महिला कलाकार भाजप आणि मनसेशी संबंधित, किरण माने यांचा नवा दावा

किरण मानेला मोठं व्हायचंय म्हणून हा सगळा वेडेपणा, मनसेनंतर आता शिवसेनाही विरोधात!

Kiran Mane Post : ‘कट रचला जातोय; पण माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेन’

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....