
Jaya Bachchan Called Karisma Kapoor Daughter In law : अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 साली उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. त्या दोघांना समायरा आणि कियान अशी दोन मुलंही आहेत. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी 2014 साली करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज कला आणि 2016 साली ते कायदेशीररित्या वेगळे झाले. दरम्यान गेल्या आठवड्यात करिश्माचा पूर्व पती, उद्योजक संजय कपूर याचे लंडनमध्ये निधन झाले. पोलो खेलत असतानाचा त्याला हार्ट अटॅक आला,. तातडीने रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र तेथ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तो फक्त 53 वर्षांचा होता. यामुळे कपूर कुटुंबालाही मोठा धक्का बसला असून उद्योग जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र संजयशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री करिश्मा कपूरी ही बच्चन कुटुंबाची सून होणार होती, हे तुम्हाला माहीत आहे का ? 2002 साली करिश्मा आणि अभिषेक या दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांनी त्यांचं नातं मोडल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर पुढल्याच वर्षी करिश्माने संजय कपूरशी लग्न केलं. तर 2007 साली अभिषेकने ऐश्नर्या रायशी लग्न केलं.
होणारी सून.. जया बच्चननी करिश्माची ओळख करून दिली तेव्हा…
2002 साली अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवशी, ‘टू बी ऑर नॉट टू बी: अमिताभ बच्चन’ या सुपरस्टारच्या पिक्टोरियल बायोग्राफीचे प्रकाशन झाले. याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. आता, त्या क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला “भावी सून” म्हणत सर्वांशी ओळख करून दिली.
“बच्चन कुटुंब, नंदा कुटुंबासह, आमच्या ग्रुपमध्ये आणखी एका कुटुंबाचे स्वागत करते आणि ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर आणि बबिता कपूर आणि माझी भावी सून, करिश्मा कपूर. वडिलांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेकने त्याच्या आई-वडिलांना दिलेलं हे ( करिश्माशी नातं) गिफ्ट आहे” असं जया बच्चन यांनी जाहीर केलं. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने 1997 साली मध्ये राजन नंदा आणि रितू नंदा (राज कपूर यांची मुलगी) यांचा मुलगा निखिल नंदाशी लग्न केलं होते.
अभिषेक करिश्माचं लग्न का मोडलं ?
मात्र यानंतर अवघ्या काहीच महिन्यांनी करिश्मा-अभिषेकचं नात मोडलं. पण असं का झालं हे कपूर किंवा बच्चन कुटुंबाने कधीच उघड केलं नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार, करिश्माची आई बबिता यांच्यामुळे हे घडलं. असं म्हटलं जातं की, लग्नापूर्वीचा करार (प्री-न्यूप्चुअल अग्रीमेंट) करावा अशी बबिता आंची इच्छा होती. त्यानुसार करिश्माचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अमिताभ त्याच्या मालमत्तेचा एक भाग अभिषेककडे हस्तांतरित करतील, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. बबिता यांच्या मागणीमागचं कारण योग्य होतं कारण लग्न ठरलं तेव्हा करिश्मा सुपरस्टार होती. 1991 सालीच तिने करिअर सुरू केलं होतं. तर अभिषेकचा हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील प्रवास मात्र 2000 साली नुकताच सुरू झाला होता. मात्र प्री-न्यूप्चुअल अग्रीमेंट करण्यास बच्चन कुटुंबाने नकार दिला, त्यामुळेच अभिषेक-करिश्माचं नातं मोडलं, अशी चर्चा होती.