
बॉलीवुड में कई प्रतिष्ठित कुटुंब म्हणजे कपूर. या कुटुंबातील सगळेच स्टार आहेत. प्रत्येक पिढीची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे. यातील हीट जोडी म्हणजे करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोन बहिणींची.कारण या दोघींनीही बॉलिवूडवर राज्य केलं. 90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री करिश्मा कपूर त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी ती कपूर घराण्यातील पहिली मुलगी होती. तिने अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले. तर 2000 पासून करीनाचीही बॉलिवूडमध्ये ओळख व्हायला सुरुवात झाली आणि तिने देखील तिच्या वेगळ्या भूमिकांनी बॉलिवूडमध्ये आपल ओळख निर्माण केली.
करिश्मा आणि करीनाचे टोपणनावामागील रंजक किस्से
पण या दोघींबाबत अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांची टोपणनावे. करिश्मा आणि करीनाचे टोपणनाव आहे. जे त्यांच्या घरापासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वजणच बोलतात. जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोक करिश्माला “लोलो” म्हणतात, तर करीना कपूर हिचे टोपणनाव “बेबो” आहे. कपूर बहिणींची टोपणनाव खूप लोकप्रिय आहेत. परंतु त्यांना ही नावे कोणी दिली आणि ती कशी बनली हे फार कमी लोकांना माहिती आहे. यामागे ही रंजक किस्से आहेत.चला जाणून घेऊयात.
करिश्मा कपूरला ‘लोलो’ हे नाव कसं पडलं?
करिश्मा कपूरने एका शोमध्ये याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. त्या शोमध्ये एका महिलेने तिला तिच्या “लोलो” टोपणनावामागील कहाणी विचारली. तेव्हा करिश्माने सांगितले की “माझी आई, बबिता कपूर, हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोची खूप मोठी चाहती होती. तिच्या नावाने प्रेरित होऊन माझ्या आईने हे नाव निवडले.” असे तिने सांगितले. तसेच सिंधी लोक गोड लोली किंवा लोलो नावाचा ब्रेड बनवतात, म्हणून तिच्या वडिलांनाही ते टोपणनाव म्हणून फार आवडलं असल्याचं तिने सांगितले.
करीना कपूरला ‘बेबो’ हे नाव कोणी दिले?
करिश्माने तेव्हाच तिची बहीण करीना कपूरच्या बेबो टोपणनावामागील कहाणी सांगताना म्हटलं की, “जेव्हा करीनाचा जन्म झाला तेव्हा सर्वांना वाटले की तिचे एक गोंडस आणि मजेदार टोपणनाव असावे. कुटुंबात चिंटू आणि लोलो अशी नावे असल्याने तिच्या वडिलांनी करीनाला बेबो असे नाव ठेवले.” असं सांगितलं. तसेच करिश्माने असेही सांगितले की तिचे आजोबा राज कपूर राजकुमारासारखे दिसत असल्याने त्यांनाही ‘राज्य’ हे टोपणनाव देण्यात आले होते.