
मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत त्याने लग्नगाठ बांधली. मात्र सध्या आदेश बांदेकर यांच्या सूनबाई पूजा बिरारी या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत, ते म्हणजे मेहंदी सोहळ्यात पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर एक कुत्र्याचं चित्र काढलं होतं. बिरारी यांची ही मेहंदी बघून अनेकांना असा प्रश्न पडला की, पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर कुत्र्याचं चित्र का काढलं असेल? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर स्वत: अभिनेते आदेश बांदेकर यांनीच दिलं आहे.
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम याचं नुकतचं लग्न झालं आहे. त्याने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न केलं. मात्र पूजा बिरारी यांनी मेहंदी सोहळ्यात आपल्या हातावर कुत्र्याचं चित्र काढलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या, बिरारी यांनी आपल्या हातावर कुत्र्याच्या पिल्लाचं चित्र का काढलं असावं? असा प्रश्नही अनेकांना पडला, आता याबाबत स्वत: आदेश बांदेकर यांनी मोठा खुलासा केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर ज्या कुत्र्याचं चित्र काढलं आहे, तो कुत्रा म्हणजे सिंबा आहे, असं आदेश बांदेकर यांनी म्हटलं आहे. सिंबा हे आदेश बांदेकर यांच्या कुत्र्याचं नाव आहे. आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम लहान असताना बांदेकर कुटुंबानं सिंबाला आपल्या घरी आणलं होतं. त्यानंतर या कुटुंबाला या कुत्र्याचा एवढा लळा लागला की तेव्हापासून हा कुत्रा त्यांच्याच घरी आहे.
घरातील एका सदस्याएवढंच बांदेकर कुटुंबाचं या कुत्र्यावर प्रेम आहे. सिंबा आता 17 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे तो थकला देखील आहे. आदेश बांदेकर यांच्या मुलाचं सोहमचं देखील या कुत्र्यावर खूप जीव आहे. सिंबाला आपल्या लग्नात आणण्याची सोहमची इच्छा होती, मात्र आता सिंबा 17 वर्षांचा असल्यामुळे एवढी धावपळ त्याला जमली नसती, त्यामुळे इच्छा असून देखील बांदेकर कुटुंबाला या लग्नसोहळ्यात सिंबाला आणता आलं नाही. त्यामुळे पूजा बिरारी यांनी आपल्या हातावर जे कुत्र्याचं चित्र काढलं आहे, ते या सिंबाचं आहे, असा खुलासा आदेश बांदेकर यांनी केला आहे.