
'ये है मोहब्बतें' या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 13 मार्च 2023 रोजी तिने बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाशी लग्न केलं. आधी बंगाली आणि नंतर पारसी विवाहपद्धतीनुसार दोघं विवाहबंधनात अडकले.

बंगाली विवाहपद्धतीनुसार लग्न करताना कृष्णाने लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर साजेसा मोत्यांचा हार आणि इतर भरजरी दागिने घातले होते.

बंगाली लूकमध्ये कृष्णा मुखर्जी खूपच सुंदर दिसत होती. कृष्णाने 'ये है मोहब्बतें' या मालिकेत आलियाची भूमिका साकारली होती. चिराग हा क्रूझ शिप डेक ऑफिसर आहे.

गोव्याच्या समुद्रकिनारी कृष्णा आणि चिरागने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला 'ये है मोहब्बतें' मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कृष्णा आणि चिरागचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी दोघांनी प्री-वेडिंग शूटचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता या दोघांवर चाहत्यांकडून आणि टेलिव्हिजिन इंडस्ट्रीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.