‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमा पाहा घरबसल्या, कधी आणि कुठे जाणून घ्या

'घर बंदूक बिर्याणी' सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रेक्षकांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता प्रेक्षकांना 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमा घर बसल्या पाहाता येणार आहे. जाणून घ्या तुम्हाला कधी आणि कुठे पाहता येणार 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमा..

घर बंदूक बिर्याणी सिनेमा पाहा घरबसल्या, कधी आणि कुठे जाणून घ्या
| Updated on: Sep 30, 2023 | 3:10 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : नवीन सिनेमे पाहायला प्रत्येकाला आवडतं. पण धकाधकीच्या जीवनात नेहमी चित्रपटगृहात जावून सिनेमा पाहणं प्रत्येकासाठी शक्य नव्हतं. पण प्रेक्षकांना ‘झी टॉकीज’ नवीन सिनेमे पाहता येतात. ‘झी टॉकीज’ कोणता सिनेमा पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात . ही उत्सुकता लवकरच संपणार असून झी टॉकीज प्रेक्षकांसाठी रविवार १ ऑक्टोबरला ‘घर बंदूक बिर्याणी’ हा हटके विषय असलेला सिनेमा पाहता येणार आहे . दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सिनेमात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेते सयाजी शिंदे असा त्रिवेणी संगम असलेला ‘घर बंदूक बिर्याणी’ रविवार १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय .

‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. प्रेक्षकांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता प्रेक्षकांना ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमा घर बसल्या पाहाता येणार आहे. हेमंत अवताडे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला हा सिनेमा एकमेव असा मराठी सिनेमा आहे जो एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीमुळे सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एका साध्या सरळ विषयाची अत्यंत उत्कंठावर्धक मांडणी असलेला ‘घर बंदूक बिर्याणी’ हा नक्कीच एक वेगळा प्रयोग आहे. त्यामुळे सिनेमाला चाहत्यांनी पसंती दर्शवली.

वेग-वेगळ्या पदार्थांमुळे बिर्याणी ज्याप्रकारे चविष्ट बनते, त्याचप्रमाणे ‘घर बंदूक बिर्याणी’ हा सिनेमा पण संवाद, गाणी, अभिनय, दिग्दर्शन, कथा अशा सगळ्या गोष्टींमुळे सिनेमा एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

आता छोट्या पडद्यावर झी टॉकीज वाहिनी हा सिनेमा खास प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे . रविवारी सिनेमा प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांना सुट्टीच्या दिवशी निवांतपणे सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमा छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे रविवारी अनेकांसाठी खास असणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमा नक्की पाहा.