FEATURED

Constitution Day: 53 हजार लोकांनी इतिहास घडताना पाहिला, संविधान निर्मितीची रंजक कथा, तुम्ही वाचली का?

Constitution of India: आज संविधान दिवस आहे. देशात सध्या राज्य घटनेवरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहे. कोणी संविधान खत्रे में है म्हणत आहे तर कोणी राज्य घटना सध्याच्या काळात सुरक्षित असल्याचा दावा करत आहेत. त्याचवेळी संविधान निर्मितीची ही रंजक कथा तुम्ही नक्कीच वाचायला हवी.

Constitution Day: 53 हजार लोकांनी इतिहास घडताना पाहिला, संविधान निर्मितीची रंजक कथा, तुम्ही वाचली का?
53 हजार लोकांनी इतिहास घडताना पाहिला, संविधान निर्मितीची रंजक कथा
| Updated on: Nov 26, 2026 | 1:51 PM

Constitution day 26 November 2026: आज संविधान दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले होते. तर पुढे 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्य घटना अंमलात आणली. सध्या संविधानावरून दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. त्याचवेळी संविधान निर्मितीची ती रंजक प्रक्रिया तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. राज्य घटना तयार करण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागला. संविधान निर्मितीची ही प्रक्रिया केवळ तज्ज्ञांनीच नाही तर 53 हजार सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवली. ती प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे का?

बोलण्याची, टाळ्या वाजवण्याची नव्हती मुभा

Loading...

भारतीय राज्य घटना तयार होताना संविधान सभेच्या कामकाजाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सभागृहातील सदस्यच नाही तर सामान्य नागरिकांनीही ही प्रक्रिया अनुभवली. 1948 मध्ये हिवाळ्यात हे कामकाज सामान्य भारतीयांना अनुभवता आले. दीर्घ पल्ल्याचा युक्तीवाद, संविधान सभेतील छोट्या छोट्या शब्दांवरून सुरू असलेली खडाजंगी, भाषिक आणि शा‍ब्दिक चिकित्सा, मुद्यावरून होणारे मतभेद, शब्द फोड, मुद्दा पटवून देतानाचे संदर्भ हा असा विपुल अभ्यासू लोकांचा सहवास सामान्यांना एका अंतरावरून अनुभवता आला. दिल्लीतील संविधान सभेच्या सभागृहातील प्रेक्षक दीर्घिकेतून या सर्व घडामोडींचे अवलोकन सामान्य भारतीयांना करता आले. पण या ठिकाणी एक कडक ताकीद देण्यात आली होती. युक्तीवाद सुरू असताना, नेत्यांची पल्लेदार भाषणं आणि बाजू मांडत असताना कोणीही टाळी वाजवणार नाही की कोणी समर्थनार्थ नारे देणार नाही. केवळ मुक प्रेक्षक बनून त्यांना हे ज्ञान रसग्रहण करण्याची परवानगी देण्यात आली होती.

जवळपास तीन वर्षांचा दीर्घ कालावधी

राज्य घटना निर्मितीचा कालावधी प्रदीर्घ आहे. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा हा प्रवास आहे. यामध्ये संविधान निर्मितीसाठी 11 सत्रे पार पडली तर संविधान निर्मितीसाठी 167 बैठका झाल्यात. सरकारकडील नोंद असलेल्या दप्तरानुसार, या कालावधीत 53 हजारांहून अधिक नागरिकांनी संविधान निर्मितीचा हा इतिहास डोळ्यासमोर घडताना पाहिला. डोळ्यात साठवला. नागरिकांचे हक्क, भाषेचा मुद्दा, भविष्याचा वेध घेत करण्यात येत असलेल्या क्रांतीकारक तरतुदी. या देशाचा संपन्न इतिहास साक्षीला ठेवत आधुनिक भारताचे चित्र चितारण्याचे काम संविधान सभेने मन लावून केले. तर याचि देहि याचि डोळा, हा सोहळा हजारो नागरिकांनी पाहिलाच नाही तर तो स्मरणात जतन करून ठेवला. त्या पिढीतील कोण लोक आता हयात असतील, ते माहिती नाही. पण त्यांनी एक इतिहास घडताना पाहिला, हे सत्य नाकारता येणार नाही.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने राज्य घटना स्वीकारली. तोच दिवस आज आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आणण्यात आली. घटनेत 395 अनुच्छेद, 22 भाग आणि 8 अनुसूची आहे. या घटना निर्मितीच्या प्रक्रियेत 15 महिलांनीही मोलाची भूमिका बजावली. यामध्ये सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, सुचेता कृपलानी आणि दुर्गाबाई देशमुख यासारख्या विदुषीने त्यात हिरारीने सहभाग घेतला. विशेष म्हणजे संविधानाची मूळ प्रत ही छापलेली नाही तर इंग्रजी आणि हिंदीत प्रेम बिहारी नारायण रायझादा यांनी सुलेखन कलेतून हाताने लिहिलेली आहे. तर शांतिनिकेतनचे आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली पानांवर कलात्मक चित्रे साकारण्यात आली आहे.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us