मायासाठी वनतारा मदतीला धावली, हत्तीच्या आजारी पिल्लाला केले एअरलिप्ट, अनंत अंबानी यांच्या प्राणी प्रेमाने सर्वच भारावले
Elephant Calf Maya Vantara Anant Ambani: जन्मापासून आईपासून दुरावलेल्या आणि गेल्या दीड वर्षांपासून वनविभागाने जीवापाड जपलेल्या हत्तीच्या आजारी पिलासाठी वनतारा मदतीला धावली. माया या पिल्लाला जामनगर येथे नेण्यासाठी एअरलिफ्ट करण्यात आले.

Elephant Calf Maya Vantara Anant Ambani: जन्मापासूनच आईपासून दुरावलेली माया आता वनताराच्या सुरक्षित अधिवासात जाणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून वनविभागाने तिला जीवापाड जपले होते. तिच्या पुढच्या पायांची हाडे फॅक्चर झाल्याने आणि प्रकृती अत्यंत खालावल्याने या १८ महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लाला उपचारांसाठी केरळमधून गुजरातमधील जामनगर येथे विमानाने हलविण्यात आले. अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने ‘वनतारा’ने विशेष पशुवैद्यकीय पथक तैनात करून शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी मायाला आपल्या अतिदक्षता उपचार केंद्रात दाखल केले. केरळचे मुख्य वन्यजीव रक्षक डॉ. पी. पुगळेंडी (आयएफएस) यांनी दिलेल्या स्थलांतर आदेशानंतर ही प्रक्रिया पार पडली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांची पिल्लावर ‘माया’
केरळमधील मलयादूर वनविभागाच्या काप्रिक्कड परिसरात १९ एप्रिल २०२५ रोजी माया नदीकिनारी एकटीच आढळली होती. तिचा कळप नदी ओलांडून पुढे गेला होता; मात्र नवजात मायाला सोबत नेण्यात आले नव्हते. आईचे पहिले दूधही न मिळाल्याने ती अशक्त झाली होती. तिला स्वतःहून दूधही पिता येत नव्हते. त्यानंतर सहाय्यक वनं पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिनॉय सी. बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र तिची देखभाल केली. विशेष काळजी घेत तिला वाढविले आणि तिचे नाव ‘माया’ ठेवले.
खेळताना पडली माया, प्रकृती अधिक चिंताजनक
जुलै २०२६ मध्ये खेळताना माया घसरली आणि तिच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओथेरपी, स्प्लिंट्स आणि पोषणपूरक औषधोपचार करूनही तिची हाडे अधिकच ठिसूळ होत गेली. ऑक्टोबरच्या अखेरीस तर तिला स्वतःच्या पायांवर उभे राहणेही अशक्य झाले. दोन्ही पुढच्या पायांची हाडे फॅक्चर होण्याबरोबरच छातीचा संसर्ग आणि शरीरावर दीर्घकाळ एकाच स्थितीत पडून राहिल्याने जखमा झाल्या. तिची प्रकृती चिंताजनक झाली होती.
मायाला वाचविण्यासाठी उपचारांचे सर्व पर्याय तपासण्यांचा निर्णय केरळच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी घेतला. यासाठी हत्तींच्या उपचारातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. कुशल कोंवर सरमा यांचे मत मागविण्यात आले. त्यांनी वनताराचे पशुवैद्यकीय सल्लागार म्हणून काम करताना मायाच्या आजारामागे पॅराथायरॉईड ग्रंथीशी संबंधित विकार अंसण्याची शक्यता वर्तवली. योग्य उपचारांनी या आजारावर मात करता येऊ शकते, असे मत त्यांनी मांडले. वनताराच्या एलिफंट केअर सेंटरचे प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यदुराज खडपेकर यांनीही या निदानाशी सहमती दर्शविली. त्यानंतर वैद्यकीय मंडळाने एकमताने मायाला उपचारांची संधी देण्याचा निर्णय घेतला.
मायासोबत विशेष तज्ज्ञांचे पथक
असलेल्या विमानातून जामनगरला आणण्यात आले. या प्रवासात वनताराचे तीन हत्ती-तज्ज्ञ पशुवैद्य, पॅराव्हेट्स आणि काळजीवाहक तिच्यासोबत होते. केरळमधील तिच्यावर उपचार करणारे डॉ. बिनॉय. सी. बाबू आणि तिचा परिचित काळजीवाहक निखिल बाबू हेही तिच्यासोबत आहेत. उपचार पूर्ण होईपर्यंत निखिल बाबू तिच्या जवळच राहणार आहेत.
२४ तास वैद्यकीय देखरेखीखाली माया
वनताराच्या रुग्णालयात मायावर चोवीस तास वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येणार आहे. वेदनाशमन, प्रगत निदान चाचण्या, हायड्रॉलिक लिफ्टिंग यंत्रणेच्या साहाय्याने हालचालींसाठी मदतं आणि प्रकृतीनुसार जलोपचार अशा विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तिच्या उपचारांची जबाबदारी वनतारा पार पाडणार असले,तरी केरळ वनविभागाचे तिच्या देखभालीवरील नियंत्रण कायम राहणार आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर मायाला पुन्हा केरळमधील अभयारण्यात परत पाठविण्यासाठी वनतारा सहकार्य करणार आहे.