कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा?, ग्रामदेवता अशी जाते घरोघरी

| Updated on: Mar 07, 2023 | 12:37 PM

कोकणातला शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पालखी. मात्र या पालखीत शिमगोत्सवाला विराजमान होते ती सगळ्यांच्या मनातली ग्रामदेवता.

कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा?, ग्रामदेवता अशी जाते घरोघरी
Follow us on

सिंधुदुर्ग : कोकणातला महत्वाचा आणि पारंपारिक सण म्हणजे शिमगा. या शिमग्यातलं आकर्षण असतं ते देवाच्या पालखीचे. शिमग्याला म्हणजेच होळीला कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेल्या कोकणात होलिकोत्सववाला अर्थात शिमगोत्सवाला सुरुवात झालीय. प्रत्येक गावात हा सण साजरा केला जातो. ग्रामदैवतेचा उत्सव म्हणजेच शिमगोत्सव. या शिमगोत्सवाला चाकरमानी आवर्जुन उपस्थित राहतात. या शिमगोत्सवाची परंपरा अगदी प्राचीन काळापासून आहे. तोच वसा आजही कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने जपला जातोय. कोकणातील प्रत्येक गावात हा उत्सव केला जातो. त्यामुळे या उत्सवाला वेगळं महत्व आहे. आपल्या ग्रामदेवतेला सजवून पालखीत बसवले जाते. ग्रामदेवता गावातील प्रत्येकाही घरी जाते असते.

देवीला पालखीत सजवले जाते

कोकणातला शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पालखी. मात्र या पालखीत शिमगोत्सवाला विराजमान होते ती सगळ्यांच्या मनातली ग्रामदेवता. आपल्या ग्रामदेवतेची पालखी कोकणातल्या शिमग्याला बाहेर पडते. खरतर मार्च महिन्यात येणाऱ्या फाल्गुन पंचमीपासून या शिमगोत्सवाला सुरुवात होते. पुढे काही दिवस हा उत्सव सुरुच राहतो. शिमगोत्सव सुरु झाल्याने आपल्या देवीला पालखीत बसवून सजवण्यात येत. चौखांबात म्हणजचे मंदिरात ठरलेल्या मिटींगप्रमाणे ज्या भाविकानं होळी दिली आहे त्या ठिकाणी पालखी आणि गावकरी होळी तोडण्यासाठी जातात. पालखी मंदिराबाहेर पडते. आंबा, पोफळ, सुरमाड अशा वेगवेगळ्या झाडांचा वापर या होळीसाठी केला जातो. अशी माहिती मानकरी यांनी दिली.

शिमगोत्सवाची संस्कृती जपली जाते

कोकणात शिमगोत्सवाला पालखी आणि शिमगोत्सवातील परंपरेचं दर्शन या ठिकाणी पहायला मिळते. त्यामुळेच शिमगोत्सवात येणारी लोकं जल्लोष आणि शिमगोत्सवातील परंपरेची सांगड इथं घालताना दिसतात. एकूणच कोकणातील शिमगोत्सवात संस्कृती आणि परंपरा आजतागायत जपली जातेय. राज्यभरात शिमगोत्सव साजरा केला जातो. पण, कोकणातली मजा काही औरच आहे. मुंबईत नोकरी किंवा कामानिमित्त राहणारे शिमगोत्सवात कोकणात परत येतात. ही संस्कृती जपून ठेवण्याचे काम या माध्यमातून केले जाते.