AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : शिवसेना ठाकरे गटात जोरदार इनकमिंग, पुण्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतली मशाल

PMC Election : पुण्यातील एका माजी नगरसेवकासह अनेक नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Pune : शिवसेना ठाकरे गटात जोरदार इनकमिंग, पुण्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतली मशाल
Pune Shivsena UBTImage Credit source: X
| Updated on: Dec 06, 2025 | 4:04 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहे. काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर किंवा तत्पूर्वी महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इनकमिंग झाली आहे. एका माजी नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यातील अनेक नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

महानगर पालिका निवडणुकीची घोषणा होणार

निवडणूक आयोगाकडून आगामी काळात पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरूस्तीचे काम आयोगाकडून सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात आणखी काही पक्षप्रवेशही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

युती होणार?

पुणे महानगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगर परिषदांच्या निवडणूकीत अनेक पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुण्यात आता महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.