
दिवाळी हा भारतातला सगळ्यात मोठा सण आहे. सगळीकडे रोषणाई, नवे कपडे, फराळ, लाईट्स! हा दिव्यांचा सण सगळीकडे उजेड घेऊन येतो. दिवाळी फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते.

फुलांची सजावट: घर सजवताना तुम्ही फुलांनी सजवू शकता. फुलांची रांगोळी काढू शकता, फुलांच्या माळा भिंतीवर लावू शकता. पायऱ्यांवर फुलं टाकू शकता. फुलांचा सुगंध घरात प्रसन्नता ठेवतो. फुलांनी सजवलेलं घर उत्तम!

रांगोळी: दारात रांगोळी काढा. सणासुदीच्या दिवसांत तर रांगोळी काढायलाच हवी. फुलांचा, रंगांचा वापर करून तुम्ही दारात रांगोळी काढू शकता. यात तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन बनवू शकता. रांगोळीच्या डिझाइन इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत.

लाईट्स: दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. तुम्ही तुमचं घर लाईट्सने सजवू शकता. बाल्कनीमध्ये तुम्ही लाईट्स लावू शकता. लाईट्सचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दिव्यांच्या झगमगाटात घर उजळून निघेल आणि सजावटही चांगली होईल.

भितींवर सजावट: दिवाळीत अनेकजण घराला रंग देतात. रंग दिला की घर सुंदर आणि छान दिसतं. रंग जरी नसेल दिला तरी तुम्ही रंगीबेरंगी कागदाने घराच्या भिंती सजवू शकता.