Jaan Kumar Sanu | बाप-लेकाच्या नात्यात फूट, कुमार सानूंकडून जानला ‘आडनाव’ बदलण्याचा सल्ला

कुमार सानू यांनीदेखील जानच्या या वक्तव्यामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जानला स्वतःचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे.

Jaan Kumar Sanu | बाप-लेकाच्या नात्यात फूट, कुमार सानूंकडून जानला ‘आडनाव’ बदलण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 11:02 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या घरातून जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) बाहेर पडला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आता जान आणि कुमार सानू (Kumar Sanu) यांच्यामध्ये नाराजी सत्र सुरू झाले आहे. जानने घराबाहेर आल्यावर वडील कुमार सानू यांच्या वक्तव्यावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांना आपल्या संस्कारांविषयी बोलण्याचा काहीच हक्क नसल्याचे जानने म्हटले होते. त्यानंतर आता कुमार सानू यांनीदेखील जानच्या या वक्तव्यामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जानला स्वतःचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे (Kumar Sanu Asked his son jaan kumar sanu to change his name).

आपले वडील अर्थात कुमार सानू हे त्यांच्या परिवारासोबत राहत नाहीत. तसेच, ते त्यांच्या मुलांना भेटत देखील नाहीत, असे जान कुमार सानू म्हणाला होता. जानच्या या वक्तव्यामुळे कुमार सानू नाराज झाले आहेत. कुमार सानू यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जानच्या या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुलांचा ताबा त्यांच्या आईकडे होता…

या मुलाखती दरम्यान कुमार सानू म्हणतात, ‘मुलांची कस्टडी त्याची आई रिटा भट्टाचार्यकडे असल्याने, मी माझ्या मुलांना भेटू शकत नव्हतो. परंतु, काही ठराविक काळासाठी मी नेहमी त्यांना भेट होतो.’

‘दुसऱ्या लग्नानंतर मी भारताबाहेर निघून गेलो. त्यावेळी माझ्याकडे जास्त काही काम नव्हते. परंतु, जेव्हा जेव्हा भारतात आलो, तेव्हा तेव्हा माझ्या तीनही मुलांना जेसी, जीको आणि जान यांना भेटतो. बऱ्याचदा आम्ही एकत्र जेवायलादेखील जातो. ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. मात्र, कधीही मुलांनी फोन केला आणि मी मुंबईत असलो तर त्यांना नक्की भेटतो. शिवाय, फोनच्या माध्यमातून नेहमीच संपर्कात असतो’, असे कुमार सानू म्हणाले (Kumar Sanu Asked his son jaan kumar sanu to change his name).

पुढे कुमार सानू म्हणतात, ‘माझे कामच असे आहे की, मी एका जागी फारकाळ थांबू शकत नाही. मी माझी पत्नी सलोनी आणि दोन्ही मुलींसोबतदेखील जास्त दिवस राहत नाही. जगभरात माझे संगीत कार्यक्रम असल्याने, मला सतत फिरतीवर राहावे लागते.’

जानने आईचे नाव लावावे…

कुमार सानू यांनी लेक जान कुमार सानूला नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, ‘जानच्या एका मुलाखतीत आणि बिग बॉसमध्ये देखील, माझी आईच माझे वडील असल्याचे म्हणताना ऐकले आहे. आईप्रति असणारा आदर कौतुकास्पद आहे. त्याने त्याच्या आईला आणखी सन्मान द्यावा असे वाटते. त्याने आपले नाव जान कुमार सानू बदलून जान रिटा भट्टाचार्य करावे. कारण रिटाने त्याच्यासाठी खूप कष्ट केले आहेत. लोक त्याची तुलना माझ्याशी करतात, ते एखाद्या नव्या कलाकारासाठी चुकीचे आहे.’

(Kumar Sanu Asked his son jaan kumar sanu to change his name)

Non Stop LIVE Update
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.