दररोज 16 ते 17 हजार परप्रांतीय मजूर मुंबई-महाराष्ट्रात परतले, गृहमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्रात दररोज 16 ते 17 हजार परप्रांतीय मजूर परतत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली (Migrant workers came back in Maharashtra).

दररोज 16 ते 17 हजार परप्रांतीय मजूर मुंबई-महाराष्ट्रात परतले, गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान आपापल्या राज्यात गेलेले लाखो परप्रांतीय मजूर आता पुन्हा राज्यात परतू लागले आहेत (Migrant workers came back in Maharashtra). राज्यात आता हळहळू उद्योग, व्यवसाय सुरु होत असल्यामुळे हे मजूर पुन्हा महाराष्ट्राकडे परतत आहेत. राज्यात दररोज 16 ते 17 हजार परप्रांतीय मजूर दाखल होत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे (Migrant workers came back in Maharashtra).

महाराष्ट्रात परतणाऱ्या सर्व मजुरांना क्वारंटाईन केलं जात आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यावर त्यांना आपापल्या कंपनीत कामावर रुजू होता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस इतर राज्यातून येणाऱ्या सर्व मजुरांच्या संपर्कात आहेत. पोलीस या सर्व मजुरांची नोंद करत असून त्यांची थर्मल तपासणीदेखील करत आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा : मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं

“महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनदरम्यान राज्यात उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले. पण आता राज्य सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरु होत आहेत”, असं अनिल देशमुख म्हणाले.

लॉकडाऊनदरम्यान श्रमिक वर्ग आपापल्या राज्यात गेले. यामध्ये युपी, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांच्या मजुरांचा समावेश आहे. मात्र, राज्यात उद्योगधंदे व्यवसाय सुरु झाल्यानंतर त्यांची घरवापसी सुरु झाली. ते पुन्हा महाराष्ट्रात येत आहेत. दररोज जवळपास 16 ते 17 हजार परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात दाखल होत आहेत. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होण्याची शक्यता आहे. या सर्व मजुरांची नोंद आणि थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, आणि पुणे शहरात दररोज पाच ते सहा हजार मजूर येत आहेत. तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दररोज जवळपास अकरा ते साडे अकरा हजार मजुर इतर राज्यांमधून येत आहेत.

महाराष्ट्रात आणि देशभरात जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला, तेव्हा लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले होते. सर्व उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांनी गावी जाणं पसंत केलं होतं. मात्र, सुरुवातीला ट्रेन बंद असल्याने शेकडो मजुरांनी पायी आपापल्या गावाची वाट धरली होती. शेकडो किमी दूर पायी प्रवास करुन मजूर आपल्या घरी पोहोचले होते. मात्र, आता उद्योग, व्यवसाय सुरु झाल्याने ते पुन्हा महाराष्ट्राकडे परतत आहेत.

हेही वाचा : सुशांतच्या घरी विशेष गॉगल होता, प्रोफाईल मॅनेजरची माहिती, श्रुती मोदीचा पोलिसांत जबाब

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *