पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे जिल्ह्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करुन मोठ्या जल्लोषात एक विवाह सोहळा पार पडला (Violation of curfew rules).

पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे (Violation of curfew rules). जुन्नर तालुक्यात मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता, मोठी गर्दी जमवून धुमधडाक्यात लग्न समारंभ पार पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे लग्न समारंभ जुन्नर तालुक्यातील वळगांव आनंद येथे पार पडलं. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे (Violation of curfew rules).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विवाह सोहळ्यांना काही अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली आहे. मात्र या अटी आणि शर्तींचे पालन न करता वडगाव आनंद येथील दोन प्रतिष्ठित कुटुंबांनी विवाह सोहळा आयोजित केला. रुचिका देवकर आणि प्रथमेश वाळुंज हे 19 मे रोजी धूमधडाक्यात विवाह बंधनात अडकले.

मात्र हा विवाह होत असताना वर-वधू पक्षाकडील दोन्ही कुटुंबियांकडून सरकारच्या नियम आणि अटींचे पालन केले गेले नाही. या लग्नात 100 ते 150 नातेवाईक एकत्र आले होते. अनेकांनी मास्क न लावता विवाह सोहळ्याला हजेरी लावली. सर्वात धक्कादायक म्हणजे वर हा दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई येथून जुन्नर तालुक्यात आला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोना विषाणूने शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातदेखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, तरीही पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करुन विवाह सोहळा पार पडला.

विवाह सोहळ्याबाबत माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी वधू-वर कुटुंबीयांवर सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकार कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची जास्त शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पुण्यात कन्टेन्मेंट झोन वगळून आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी

कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *