MAH MBA CET result 2020 जाहीर, ‘या’ वेबसाईट्सवर निकाल पाहा

MBA MCET result 2020: मुंबई : एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला

MAH MBA CET result 2020 जाहीर, 'या' वेबसाईट्सवर निकाल पाहा
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 5:41 PM

MBA MCET result 2020: मुंबई : एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला (Maharashtra Common Entrance Test, CET cell) आहे.  राज्यातील एकूण 36 हजार जागांसाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा 14 आणि 15 मार्च रोजी घेण्यात आली होती.  MAH MBA CET result 2020 या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट  mahacet.org  किंवा cetcell.mahacet.org यावर पाहू शकता

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी परीक्षेचा निकाल सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याची माहती दिली होती. त्यानुसार आज (23 मे) सकाळी 11 वाजता संकेतस्थळावर परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

ही परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात आली होती. या परीक्षेत 4 विद्यार्थ्यांना 151 ते 175 दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. तर 392 विद्यार्थ्यांना 126 ते 150 दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. 101 ते 125 दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 924 इतकी आहे. तर 51 ते 100 दरम्यान गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 55 हजार इतकी आहे.

या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 24 हजार 236 विद्यार्थ्यींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा एकूण 184 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 135 तर महाराष्ट्राबाहेरील 13 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे

निकाल कसा पाहावा :

Step 1 : निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.

Step 2 : वेबसाईटच्या होमपेजवर असलेल्या रिझल्ट या पर्यायवर क्लिक करावं

Step 3 : तुमचं लॉगईन क्रेडेंशियल टाकावं.

Step 4 : तुमचा निकाल स्क्रिनवर येईल. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंटआऊटची प्रत काढून घ्यावी.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.