मोदींच्या हिंदीने पाकिस्तानी अँकर कनफ्यूज, सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपने देशात 542 जागांपैकी 352 जागा मिळवल्या. लोकसभा निवडणुकांच्या या निकालानंतर भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. निकालानंतर गेल्या शनिवारी (25 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या 352 नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केलं. Dear @ARYNEWSOFFICIAL, Hindi word ‘Abhinandan’ means …

मोदींच्या हिंदीने पाकिस्तानी अँकर कनफ्यूज, सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपने देशात 542 जागांपैकी 352 जागा मिळवल्या. लोकसभा निवडणुकांच्या या निकालानंतर भाजपप्रणित एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. निकालानंतर गेल्या शनिवारी (25 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या 352 नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केलं.


यावेळी देशातील मीडियानेच नाही तर परदेशी मीडियानेही पंतप्रधान मोदींचं हे भाषण टेलिकास्ट केलं. यापैकीच एक पाकिस्तानी मिडीयाही होता. पण, पाकिस्तानच्या एका पत्रकारावर मोदींचं हे भाषण भारी पडलं. मोदींच्या या भाषणामुळे या पत्रकाराला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मोदींची हिंदी न समजल्याने सोशल मीडियावर या पत्रकाराची आणि पाकिस्तानी मीडियाची अक्षरश: खिल्ली उडवली जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या 352 नवनिर्वाचित खासदारांचं अभिनंदन केलं. खासदार आणि पक्षाच्या विजयाबाबत मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना मोदींनी ‘अभिनंदन’ या शब्दाचा प्रयोग केला. मात्र, पाकिस्तानी न्यूज अँकर ‘अभिनंदन’ला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान समजला. बालाकोट एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना बंदी बनवलं  होतं.

‘अभिनंदन’ या शब्दाचा अर्थ शुभेच्छा देणे, असा होतो. हे कदाचित या अँकरला माहित नसावं. म्हणून त्याने ‘अभिनंदन’ या शब्दाला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्याशी जोडलं. यानंतर सोशल मीडियावर हा पाकिस्तानी अँकर मोठ्या प्रमाणात ट्रोल होतो आहे. त्याची ही छोटीशी चूक त्याला भारी पडली आहे. ट्वीटरवर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही या पाकिस्तानी अँकरची खिल्ली उडवत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *