पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर सील

कोंढवा परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. त्याशिवाय प्रत्येक नागरिकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले (Pune Peth area seal) आहे.

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर सील

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Peth area seal) आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन अलर्ट झालं आहे. या शहरात मध्यवर्ती भागातील जवळपास 20 पेठांचा भाग सील केला जाणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत हा सर्व भाग सील असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर अनिश्चित काळासाठी मर्यादा येणार आहे.

पुणे शहरातील कोंढवा परिसर, महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय (Pune Peth area seal) परिसरात सील होणार आहे. त्यामुळे पुण्यातील मध्यवर्ती भाग सीलबंद राहणार आहे. त्यामुळे या पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. तर कोंढवा परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. त्याशिवाय प्रत्येक नागरिकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तर पुढील काळात टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागात देखील हे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे

‘या’ पेठा मध्यरात्रीपासून सील

  • महर्षीनगर
  • मुकुंदनगर
  • स्वारगेट
  • घोरपडी
  • भवानी पेठ
  • रविवार पेठ
  • शुक्रवार पेठ
  • शनिवार पेठ
  • गुरुवार पेठ
  • मंगळवार पेठ
  • सोमवार पेठ
  • रास्ता पेठ
  • कसबा पेठ
  • नाना पेठ
  • कासेवाडी
  • हरकानगर
  • नारायण पेठ
  • सॅलिसबरी पार्क
  • कोंढवा
  • शिवाजीनगर
  • कमला नेहरू हॉस्पिटल
  • केईएम हॉस्पिटल परिसर
  • गणेश कला क्रीडा
  • दत्तवाडी पोलीस स्टेशन परिसर
  • बिबवेवाडी
  • गुलटेकडी
  • सहकार नगर
  • पर्वती
  • लक्ष्मी नगर
  • गोळीबार मैदान, एपीएफ कार्यालय
  • आरटीओ ऑफिस आणि पुणे स्टेशन

या भागात गेल्या दोन दिवसात पुण्यात 37 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय कोंढवा परिसरात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सीलबंद परिसरातून कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आणि मालाची आवक जावक आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई396863741279
पुणे (शहर+ग्रामीण)7451938320
पिंपरी चिंचवड मनपा468349
ठाणे (शहर+ग्रामीण)
44303689
नवी मुंबई मनपा26738061
कल्याण डोंबिवली मनपा13189125
उल्हासनगर मनपा3316
भिवंडी निजामपूर मनपा134116
मिरा भाईंदर मनपा69915713
पालघर 14413
वसई विरार मनपा87410527
रायगड609518
पनवेल मनपा49921
नाशिक (शहर +ग्रामीण)38728
मालेगाव मनपा74858
अहमदनगर (शहर+ग्रामीण)120366
धुळे14016
जळगाव 616172
नंदूरबार 353
सोलापूर8974170
सातारा523316
कोल्हापूर 45724
सांगली112291
सिंधुदुर्ग3320
रत्नागिरी26425
औरंगाबाद15011465
जालना1250
हिंगोली 14910
परभणी631
लातूर 12583
उस्मानाबाद 7330
बीड470
नांदेड 1116
अकोला 5841428
अमरावती 22616
यवतमाळ 130221
बुलडाणा 6283
वाशिम 80
नागपूर5748410
वर्धा 1201
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)59015
एकूण67655293292286
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *