Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

Corona Virus : कोरोनामुळे 'हे' पहिल्यांदाच घडतंय
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 12:11 AM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत (Things happening first time in world due to corona) आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

1.पाकिस्तानच्या पंजाब राज्यात तब्लिगी जमातीचे 300 हून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. याआधी पाकिस्तानच्या सिंध राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त होते. मात्र आता पंजाबमध्ये सर्वात जास्त कोरोनारुग्णांची नोंद झालीय. पंजाबमध्ये फक्त 24 तासात नवे 184 कोरोनारुग्ण सापडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही 14 कोरोनाग्रस्त आहेत.

2. इटलीत पहिल्यांदाच कोरोनामुळे मृतांचा आकडा कमी झालाय. त्याचबरोबर नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या संख्येतही घट होतेय. त्यासोबतच थेट अतिदक्षता विभागात दाखल करावं लागणाऱ्यांची संख्याही कमी झाल्यामुळे इतर आवश्यक रुग्णांना व्हेंटिलेटर्स दिले जात आहेत.

3. अमेरिकेला चीननं 1 हजार व्हेंटिलेटर्स दान केले आहेत. न्यूयॉर्क शहरासाठी हे सर्व व्हेंटिलेटर वापरले जाणार आहेत. सीएनबीसीनं ही बातमी दिलीय. न्यूयॉर्कच्या महापौरांच्या दाव्यानुसार तिथल्या स्थानिक प्रशासनानं सरकारकडे अजून 17 हजार व्हेंटिलेटर्सची गरज असल्याचं म्हटलंय.

4. दक्षिण अफ्रिकेत एका मुस्लिम धर्मगुरुंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दाव्यानुसार मृत मुस्लिम धर्मगुरु नुकतेच दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत 1655 लोक कोरोनाग्रस्त आहेत आणि 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 2008 च्या आकडेवारीनुसार दक्षिण अफ्रिकेची लोकसंख्या 5 कोटींच्या आसपास आहे.

5. सरकारचा नियम न पाळल्यामुळे पाकिस्तानात एका मौलानासह 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पाकिस्तान टूडेनं ही बातमी दिलीय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नमाज पठण बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र ते आदेश झुगारुन त्यांनी नमाजाचं आवाहन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

6. भारतात आतापर्यंत 1 लाख 40 हजार लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. कोरोनाच्या वर्ल्डोमीटरवर ही माहिती आहे. म्हणजे 10 लाख लोकांमध्ये 102 लोकांच्या चाचण्यात झाल्या आहेत. तर पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 35 हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यानंतर जपानमध्येही 44 हजार चाचण्या केल्या गेल्या आहेत.

7. रशियात एका तरुणानं खिडकीतून रस्त्यावरच्या 5 लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत. यात एका महिलेसह पाचही लोकांचा मृत्यू झाला. ज्या भागात ही घटना घडली, त्या भागात कोरोनामुळे कुणालाही बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले होते. हे पाचही लोक घराबाहेर पडून जोरानं बोलत असल्यामुळे त्यांना गोळ्या मारल्याचा दावा आरोपी तरुणानं केलाय.

8. कोरोनामुळे जपान सुद्धा लवकरच आणीबाणी घोषित करण्याच्या तयारीत आहे. जपानमध्ये साडेतीन हजारांहून जास्त लोकांना कोरोना झालाय. स्थानिक प्रशासनाकडून शिन्जो आबे यांच्यावर दबाव वाढत असल्यामुळे ते लवकर आणीबाणी घोषित करतील, अशी शक्यता वर्तवली गेलीय. जर अजून उशीर झाला, तर तिथल्या आरोग्य यंत्रणेपुढे अडचणी वाढण्याची शक्यता तिथल्या जाणकारांनी व्यक्त केली आहे.

9. ब्राझिलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजारांच्या वर गेला आहे. विशेष म्हणजे तिथल्या राष्ट्रपतींची कोरोनाबाबतची बेफिकीरी याआधीच चर्चेचा विषय ठरलीय. कोरोनासारखे आजार येतच असतात, मात्र त्यामुळे अर्थव्यवस्था धोक्यात टाकता येणार नाही, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 487 लोकांचा मृत्यूही झालाय.

10. स्पेनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांच्या वर गेलाय. मागच्या 24 तासात तिथं 809 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनच्या पंतप्रधानांनी याआधीच 26 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे.

11. फ्रान्स कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आलाय. फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 92 हजारांवर पोहोचलाय. तिथं 24 तासात 441 लोकांचा मृत्यू झालाय.

12. स्कॉटलंडमध्ये चीफ मेडिकल ऑफिसरला लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. कैथरीन कैल्डरवुड असं त्यांचं नाव आहे. आपल्या घरातून त्या फक्त शेजारच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्याबाबत क्षमाही मागितली. मात्र सरकारनं त्यांना तातडीनं राजीनामा देण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Things happening first time in world due to corona

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.