‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

'जनता कर्फ्यू' आणि 'कोरोना'बाबत 10 विलक्षण गोष्टी

मुंबई लोकल इतिहासात पहिल्यांदाच सलग 8 दिवस बंद राहणार आहे. आशिया खंडातल्या गर्दीच्या ठिकाणांपैकी मुंबई लोकल हे एक सर्वाधिक गर्दीचं ठिकाण आहे. (Janata Curfew Interesting Facts)

अनिश बेंद्रे

|

Mar 23, 2020 | 9:10 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत घेतलेल्या आवाहनाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. मुंबईचा कणा मानली जाणारी लोकलही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे घडलेल्या अशाच काही विलक्षण 10 गोष्टी (Janata Curfew Interesting Facts)

1. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी फक्त 10 टक्के नागरिक ‘जनता कर्फ्यू’वेळी रस्त्यावर होते, असा अंदाज आहे. त्यातही बहुतांश पोलिस आणि अत्यावश्यक सेवांमधल्या लोकांचा समावेश होता. मुंबईपासून खेड्यापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच सरकारच्या एखाद्या निर्णयाला इतक्या प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

2. पक्षीय राजकारण विसरुन सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख सरकारच्या निर्णयात सहभागी झाले आणि जनता कर्फ्यूचंही सर्वांनी स्वागतही केलं. महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे कर्फ्यूची वेळ वाढवण्यात आली आहे.

3. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हची सकाळ पहिल्यांदाच एकाही माणसाविना झाली. रोज इथे शेकडो जण सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंगसाठी येतात. मात्र मरीन ड्राईव्हच्या निर्माणानंतर सलग 12 तास हे ठिकाण निर्मनुष्य राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

4. मुंबई लोकल इतिहासात पहिल्यांदाच सलग 8 दिवस बंद राहणार आहे. मुंबई लोकलने रोज 75 लाख जण प्रवास करतात. आशिया खंडातल्या गर्दीच्या ठिकाणांपैकी मुंबई लोकल हे एक सर्वाधिक गर्दीचं ठिकाण आहे. त्याशिवाय मुंबई लोकल ही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून धावते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल बंद करण्यात आली आहे.

5. प्रमुख वाहतूक व्यवस्था बंद असतानाही राज्यात काही ठिकाणचे टोलनाके मात्र सुरु आहेत. टोल आणि पासच्या देवाण-घेवाणीवेळी टोल कर्मचाऱ्यांचे हात शेकडो चालकाना स्पर्श करतात. त्यामुळे टोलवाल्यांना बंदी का नाही, यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

(Janata Curfew Interesting Facts)

6. जगातल्या कोणत्याही देशाला पुढील काही दिवस भारतात शिरता येणार नाही. बाहेरच्या कोणत्याही देशातल्या विमानाला भारतीय एअर स्पेसमध्ये शिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधीच भारताने आपल्या शेजारच्या पाचही देशांच्या सीमा बंद केल्या आहेत.

7. महाराष्ट्रातली शासकीय कार्यालयं इतिहासात पहिल्यांदाच फक्त 5 टक्के कर्मचाऱ्यांवर चालणार आहेत. कोरोनामुळे याआधी 50 टक्के कर्मचाऱ्यांचा निर्णय झाला होता. तो नंतर 25 टक्क्यांवर नेण्यात आला. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता फक्त 5 टक्के कर्मचारीच सरकारी कार्यालयांमध्ये दिसणार आहेत.

8. जगात जे मान्यताप्राप्त देश आहेत, त्यापैकी अद्याप फक्त 11 देशच कोरोनापासून दूर आहेत. ज्यांचं भौगोलिक स्थान पूर्णपणे विलप्त आहेत. तेच देश या घडीपर्यंत कोरोनाच्या प्रादूर्भावापासनू वाचू शकले आहेत. पलावू, सोमोलेन आयलँड, सामोआ अश्या काही 11 देशांमध्ये कोरोना पोहोचलेला नाही. तर नेपाळ, फिजी, कांगो या देशांमध्ये 1 किंवा दोनच कोरोना रुग्ण आहेत

9. कोरोनामुळे इटलीत एकाच दिवसात 800 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. चीननंतर इटली या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

10. लखनौत एक महिला अवघ्या 4 दिवसात कोरोनामुक्त झाली आहे. संबंधित महिलेला स्वाईन फ्लूसाठी दिल्या जाणाऱ्या टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या दिल्या गेल्या. आणि फक्त चारच दिवसात या महिलेचा आजार बरा झालाय. सध्या तिला घरी सोडण्यात आलं आहे. मात्र तरीसुद्धा पुढचे 14 दिवस तिला सक्तीनं घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

(Janata Curfew Interesting Facts)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें