राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वर

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वर

राज्यात आज (6 एप्रिल) कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 868 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Apr 07, 2020 | 7:17 AM

मुंबई : राज्यात आज (6 एप्रिल) कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 868 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठण्यात आलेल्या 17 हजार 563 नमुन्यांपैकी 15 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 8 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिममधील आहे.”

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई  परिसरातील इतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात 175 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 214 टीम कार्यरत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात 178 टीम, अहमदनगर जिल्ह्यात 71, तर बुलढाणा जिल्ह्यात 147 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2855 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. त्यांनी 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

दरम्यान, आज राज्यात 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 4 जण मुंबईतील, प्रत्येकी 1 जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर मातेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे.

मृत्यूंचे विश्लेषण

  1. एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण (73 %) एवढे आहे.
  2. 45 वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे 60% मृत्यू हे 61 वर्षावरील व्यक्तींचे आहेत.
  3. कालपर्यंत झालेल्या एकूण 45 मृत्यूंपैकी साधारणपणे 78 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते.
  4. 60 वर्षांवरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 800 च्या जवळ, मुंबई 500 च्या उंबरठ्यावर

‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील

कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपविण्यासाठी संशयित नागरिकांनी लपून न राहता पुढे यावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 46 वर, अंबरनाथमध्ये एकाचा मृत्यू

मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

Total Corona Patient in Maharashtra

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें