घटस्फोट सर्वात वाईट, अमृतासोबत 16 वर्षांच्या दुराव्यानंतर सैफला उपरती

सैफने अमृतासोबतचा घटस्फोट आणि त्याचा मुलांवर पडलेला परिणाम याबाबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अमृतासोबतच्या घटस्फोटाबाबत त्याने खेद व्यक्त केला.

घटस्फोट सर्वात वाईट, अमृतासोबत 16 वर्षांच्या दुराव्यानंतर सैफला उपरती
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 3:45 PM

मुंबई : “घटस्फोट ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. अमृता आणि माझा घटस्फोट ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबाबत मला अजूनही वाटतं की, आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षी दुसरं काहीतरी असायला हवं होतं “, असं बॉलिवूड अभिनेता सैफ अली (Saif Ali Khan) खान म्हणाला आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने अमृतासोबतचा घटस्फोट आणि त्याचा मुलांवर पडलेला परिणाम याबाबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत (Saif Ali Khan).

अमृतासोबतच्या घटस्फोटाबाबत सैफने खेद व्यक्त केला. “या गोष्टीमुळे होणाऱ्या त्रासापासून मी कधी बरा होईन असं मला वाटत नाही. याबाबत काही गोष्टी आहेत ज्या मला स्वस्थ बसू देत नाहीत. मी त्यावेळी फक्त 20 वर्षांचा होतो. आज बऱ्याच गोष्टी बदलून गेल्या आहेत’, असं सैफ म्हणाला.

सैफला आपली पहिली पत्नी अमृतापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत. त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करत असताना सैफ म्हणाला की, “कोणत्याच मुलाला आपल्या आई-वडिलांपासून लांब करायला नको. यामुळे लहान मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. काही वेळा परिस्थिती वेगळी असते. मुलं पालकांसोबत राहत नाहीत किंवा पालकांबाबत मुलांच्या तक्रारी राहतात. मात्र तरीही हसत्याखेळत्या वातावरणात मुलांचं संगोपन व्हायला हवं.”

“आपली इच्छा असते की मुलांनी आई-वडिलांसोबत राहावं. मात्र, काहीवेळा मुलांच्या आई-वडिलांच्या विचारांमध्ये भिन्नता असते. या साऱ्या गोष्टींमुळे काही लोक मॉर्डन रिलेशनशिपला प्राधान्य देतात”, असं देखील सैफ अली खान म्हणाला.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे 1991 साली लग्न झालं होतं. त्यावेळी सैफ 20 वर्षांचा होता तर अमृता त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी म्हणजे 32 वर्षांची होती. दोघांचे लग्न 12 वर्षे टिकलं. काही कारणास्तव 2004 साली दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर 8 वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.