स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे नेमकं कारण काय?

नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना संसर्ग वाढताना दिसत (Navi Mumbai Corona Cases Special Report) आहे.

स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे नेमकं कारण काय?

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (Navi Mumbai Corona Cases Special Report) आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत 989 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला आहे. पण ही आकडेवारी नेमकी का वाढते याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ हा एक स्पेशल रिपोर्ट.

वाढत्या उन्हासोबतच कोरोनाचा धोका देखील दिवसेंदिवस वाढत (Navi Mumbai Corona Cases Special Report) आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीमध्ये एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. या महिन्यात तब्बल 1900 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचा प्रमाणही वाढले असून एकूण 61 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2000 वर पोहचली आहे.

नवी मुंबईत वाढते रुग्ण हे मुंबई आणि एपीएमसी मार्केट संबंधित आहेत. नवी मुंबईत 12 मार्चला पहिला रुग्ण आढळला. ही व्यक्ती मरकज येथून आली होती. त्यानंतर दुसरा रुग्ण हा बंगळूरु विमानतळावरुन नवी मुंबईत दाखल झाला आणि तिसरा रुग्ण ही 56 वर्षीय महिला होती. जी दक्षिण आफ्रिकेतून आली होती.

हेही वाचा APMC मार्केटमधील 12 सुरक्षारक्षक कोरोनाबाधित, प्रशासनाकडून खासगी बाऊन्सर

मात्र यानंतर कोरोना गुणाकार करायला सुरुवात केली. नवी मुंबईत थेट 18 रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर नवी मुंबईतील संसर्ग हा एपीएमसीमुळे वाढ गेला. एपीएमसी संबंधित रुग्णांची संख्या ही 590 वर पोहचली आहे. यात 400 हून अधिक रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहे. यात प्रामुख्याने पोलीस, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, व्यापार आणि त्याच्या संपर्कात आलेले आहेत.

तर दुसरीकडे नवी मुंबईत 50 कोरोनाबळी गेले. त्यातील 10 रुग्ण एपीएमसी संबंधित आहेत. काही पोलीस, व्यापारी आणि इतर आहेत. नवी मुंबईत कोपरखैरणे, तुर्भे आणि नेरुळमधील रुग्ण जास्त आहेत.

गेल्या तीन दिवसातील नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आढावा

दिनांक – नवे रुग्ण – मृत्यू (कंसात)

  • 28 मे –  78 (2)
  • 27 मे – 79 (5)
  • 26 मे – 63 (3)

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्रात पहिला आणि देशात सातवा क्रमांक पटकावणारी नवी मुंबई कोरोनाच्या जाळ्यात अडकली आहे. कोरोनाचा राक्षस हा धर्म, जात, प्रांत असलं काहीही बघत नाही. जो सापडेल त्याला पकडतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी घरात बसून मीच माझा रक्षक या मंत्राचं पालन करायला (Navi Mumbai Corona Cases Special Report) हवं, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : 

Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चीनच्या दुप्पट, बळींचा आकडाही जास्त

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *