Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांनी आता सात हजारांचा टप्पा ओलांडला (Corona Patient increase Pune) आहे.

Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांनी आता सात हजारांचा टप्पा ओलांडला (Corona Patient increase Pune) आहे. जिल्ह्यात काल (28 मे) दिवसभरात तब्बल 369 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 7012 वर पोहोचला (Corona Patient increase Pune) आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 310 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 13 तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत.

पुणे शहरात काल दिवसभरात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात आतापर्यंत 293 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. काल शहरात नवीन 318 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 5851 वर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यात काल (28 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे. काल 85 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या 1 हजार 982 वर गेली आहे. काल 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 18 हजार 616 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 38 हजार 939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे तिसऱ्या क्रमांकावर, कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रातील 10 महापालिका कोणत्या?

Corona | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,598 रुग्णांची भर, आकडा 59,546 वर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *