पुणे तिसऱ्या क्रमांकावर, कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रातील 10 महापालिका कोणत्या?

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. (Corona Affected Municipal Corporations in Maharashtra)

पुणे तिसऱ्या क्रमांकावर, कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रातील 10 महापालिका कोणत्या?

पुणे : कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रातील 10 महापालिकांची नावे समोर समोर आली आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेली मुंबई महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ठाणे, तर पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Corona Affected Municipal Corporations in Maharashtra)

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ठाणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने हा बदल झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा या भागाचाही समावेश होतो. तर पुणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या विभागात कोरोनामुक्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.

27 मे 2020 च्या आकडेवारीनुसार महापालिकानिहाय रुग्णसंख्या

मुंबई – 32 हजार 33
ठाणे – 6 हजार 939
पुणे – 4 हजार 998
औरंगाबाद – 1 हजार 190
पालघर – 763
रायगड – 711
सोलापूर – 566
अकोला – 426
जळगाव – 379
कोल्हापूर – 269

(Corona Affected Municipal Corporations in Maharashtra)

राज्यात काल (28 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे. काल 85 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या 1 हजार 982 वर गेली आहे. काल 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 18 हजार 616 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 38 हजार 939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारांच्या पार

मुंबईत काल दिवसभरात 1467 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 35 हजार 485 वर पोहोचली आहे. काल 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1135 वर पोहोचली आहे.

पुण्यात 5 हजार 851 कोरोनाबाधित

पुण्यात काल 318 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 851 वर पोहोचली आहे. काल  दिवसभरात 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात कालच्या दिवसात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 293 झाली आहे.

(Corona Affected Municipal Corporations in Maharashtra)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *