अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच पूल कोसळला

जळगाव : अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच लोखंडी पूल नाल्यात कोसळल्याने दहा जण जखमी झाल्याची घटना जळगावमधील प्रजापतनगर येथे घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी दहा जण जखमी झाले आहेत. लेंडी पूल असं या कोसळलेल्या पुलाचं नाव आहे. ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रजापतनगर येथील लेंडी नाल्यावर लोकांनी बांधलेला एक जुना खासगी लोखंडी पूल आहे. या …

अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच पूल कोसळला

जळगाव : अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच लोखंडी पूल नाल्यात कोसळल्याने दहा जण जखमी झाल्याची घटना जळगावमधील प्रजापतनगर येथे घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी दहा जण जखमी झाले आहेत. लेंडी पूल असं या कोसळलेल्या पुलाचं नाव आहे.

ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रजापतनगर येथील लेंडी नाल्यावर लोकांनी बांधलेला एक जुना खासगी लोखंडी पूल आहे. या पुलावरुन पार्थिव घेऊन अंत्ययात्रा जात होती. यावेळी पुलावर वजन वाढल्याने अंत्ययात्रेसह हा पूल नाल्यात कोसळला.

यात उमेश गवळी, महेश गवळी, लवेश गवळी, अमोल गवळी, दीपक गवळी, सुनील खताडे, कुणाल खताडे, गोलू खताडे, गिरजू बारसे आणि किशोर देवर्शी हे जखमी झाले आहेत.

शनिपेठेतील रहिवासी असलेले नारायण आप्पा हरी हिवरे-गवळी यांचे सोमवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून ममुराबाद रस्त्यावर असलेल्या अमरधामकडे घेऊन जात असताना ही घटना घडली.

अमरधामकडे जाण्यासाठी लेंडी नाल्यावरुन जावे लागते. त्यामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास पूल अचानक कोसळला. यामुळे अंत्ययात्रेतील नागरिकांचे कपडे आणि शरीर नाल्याच्या घाणीने माखले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *