नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, परदेशी प्रवास न केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण

नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळत (Total Corona Patient in Maharashtra) आहे. 

नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, परदेशी प्रवास न केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 11:04 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 210 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 आणि अहमदनगरमध्ये 2 असे रुग्ण सापडले आहेत. तर नुकतंच नाशिकमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये सापडलेला या रुग्णाने कोणत्याही देशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे त्याला संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमध्ये आढळलेला हा रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक व्यक्ती रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पुण्याहून कोल्हापूरला नातेवाईकाकडे आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात 2 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे 1000 रुग्णालयांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार आहेत”

“कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी आहेत. येत्या 1 एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल. जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार आहे. यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान 2000 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे 1 लाख खाटाही यामाध्यमातून उपलब्ध होणार आहेत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 85 पुणे – 27 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  14 कल्याण – 7 ठाणे – 5 नवी मुंबई – 6 यवतमाळ – 4  (यवतमाळ  येथील 3 रुग्ण चाचणी  निगेटीव्ह ) अहमदनगर – 5 सातारा – 2 कोल्हापूर – 2 गोंदिया – 1 पनवेल – 2 उल्हासनगर – 1 वसई विरार – 4 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 पुणे ग्रामीण-  1 पालघर- 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 210

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 29 मार्च

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन

भारतात कोरोनाचं थैमान, पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून नागरिकांशी संवाद साधणार

Corona LIVE: नागपूरकरांना दिलासा, कोरोनाचे आणखी दोन रुग्ण बरे

कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला

Total Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.