कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला

नागपूरमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोनाची भीती घालवण्यासाठी स्वतः नगराध्यक्षांनीच पाठीवर पंप घेऊन फवारणीचं काम केलं. (Corporator do Disinfectant spraying in Nagpur).

कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 8:47 AM

नागपूर : सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांसह आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये देखील याची भीती असल्याचं दिसत आहे. याच भीतीमुळे नागपूरमध्ये निर्जंतुकीकरणाचं काम मंदावलं. त्यामुळे यावर उपाय म्हणून स्वतः नगराध्यक्षांनीच पाठीवर पंप घेऊन फवारणीचं काम केलं. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनातली भितीही कमी झाल्याचं पाहायला मिळालं (Corporator do Disinfectant spraying in Nagpur). आता नागपूरमध्ये निर्जंतूक फवारणीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. राजेश रंगारी असं या नगराध्यक्षांचं नाव आहे. या पुढाकाराची नागपूरमध्ये सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

महादुला शहरात निर्जंतूक करण्याचं काम स्वतः नगराध्यक्षांनीच केल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन या कामाला सुरुवात केली आहे. शहराचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मनातली कोरोना संसर्गाची भीती घालवण्यासाठी हा निर्णय घेतला. या अटीतटीच्या काळात सर्वच नागरिक घाबरुन गेलेले असताना अशाप्रकारे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यासोबत राहून काम केल्यानं रंगारी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

एकूणच महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता छोट्या शहरांमध्येही निर्जंतुकीकरणाला वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला सजग राहण्याचं आवाहन केलं आहे. हा राज्यासाठी कोरोनाचा संवेदनशील आणि निर्णायक काळ असल्यानं नागरिकांनी अधिक जबाबदारीनं वागण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सरकारची आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. त्याचाच भाग म्हणून आता अगदी गल्ल्यांमध्ये जाऊन किटकनाशक फवारणीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Corona LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LockDown Effect | वैतागलेल्या तळीरामांनी चखना चोरला; मग दारु चोरीचा प्रयत्न, पदरी पडली घोर निराशा

Corona Virus | कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती, महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.