Corona Virus | कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी

हे औषध 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जात नाही. शिवाय, ज्या लोकांना डोळ्यासंबंधी कुठला आजार असेल, त्यांनाही हे औषधी दिली जाऊ नये, असं सागितलं आहे.

Corona Virus | कोरोनाला रोखण्यासाठी मलेरियाचं औषध सज्ज, ICMR ची मंजुरी
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 10:07 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने संसर्ग (Malaria Medicine For Corona) झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने मलेरिया तापाच्या उपचारासाठी वापरली जाणाऱ्या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) स्थापन केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने कोविड – 19 च्या उपचारासाठी मलेरियावरील औषध हायड्रॉक्सी-क्लोरोक्विनला (Malaria Medicine For Corona) मंजुरी दिली आहे.

हायड्रॉक्सी-क्लोरोक्विनने कोरोनाचा उपचार

संशयित किंवा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. ही माहिती सरकारने पत्रकार परिषदेत दिली. आयसीएमआरचे महासंचालक बलाराम भार्गव म्हणाले की, कोरोना विषाणू संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार करत असलेले आरोग्य कर्मचारी किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या संसर्गाची अति जोखीम असलेल्यांना (Malaria Medicine For Corona) हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन देण्यात यावे.

मर्यादित प्रमाणात वापर करावा

नॅशनल टास्क फोर्स द्वारे शिफारस करण्यात आलेल्या या ट्रीटमेंट प्रोटोकॉलला जनरल कंट्रोलर ऑफ इंडियानेही मान्यता दिली आहे. मात्र, या औषधाचा उपयोग आपातकालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणातच करता येईल.

हे औषध लहान मुलांसाठी नाही

हे औषध 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जात नाही. शिवाय, ज्या लोकांना डोळ्यासंबंधी कुठला आजार असेल, त्यांनाही हे औषध दिलं जाऊ नये, असं सागितलं आहे.

सल्लामसलतनुसार, हे औषध केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्देशानुसारच द्यावे. तसेच, काही डॉक्टरांच्या मते, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे औषध घेणं धोकादायक ठरु शकतं.

हे औषध घेताना थोडी काळजीही घेणे गरजेचं आहे. हे औषध दिवसाला दोनवेळा 400 मिलीग्राम दिलं जावं. त्यानंतर ते आठवड्याला 400 मिलीग्राम एकदा असं 7 आठवड्यांपर्यंत (Malaria Medicine For Corona) देण्यात यावं.

टीप : कुणीही स्वत:हून हे औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच या औषधाचा वापर करावा. 

संबंधित बातम्या :

Corona : ‘चला उघड्यावर शिंकू, विषाणूला आणखी पसरवू’, इन्फोसिसच्या दीडशहाण्या इंजिनिअरला अटक, नोकरीही गेली

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

परदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र

घराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.