Corona LIVE: कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईहून दुचाकीने गावी येत असताना अपघात, आई-वडिलांसह लहान मुलाचा मृत्यू

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर

Corona LIVE: कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईहून दुचाकीने गावी येत असताना अपघात, आई-वडिलांसह लहान मुलाचा मृत्यू
Picture

27 लाख रुपयांचे सॅनिटायझर आणि मास्क जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी तब्बल 27 लाख रुपयांचे सॅनिटायझर आणि मास्क जप्त केले आहे. तसेच पाच आरोपींनाही अटक केली आहे. आदर्श मिश्रा (21), शुभम तिवारी (23), अश्रफ शेख (50), अख्तर हुसैन मोहरम हुसैन फारिक (48) आणि युसूफ अन्सारी (31) अशी आरोपींची नावं आहेत.

29/03/2020,2:38PM
Picture

फोर व्हीलरला प्रेसचा बोर्ड लावून चार तरुणी रत्नागिरीत दाखल

मुंबईतील चाकरमानी कोकणात येण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत. मुंबईतील चार तुरणींनी फोर व्हीलरला प्रेसचा बोर्ड लावून रत्नागिरीत प्रवेश केला आहे. रत्नागिरी पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघड झाला आहे. चार तरुणींना जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले आहे.

29/03/2020,1:19PM
Picture

मुंबईत कोरोनाचा सातवा बळी

मुंबईत कोरोनाचा सातवा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात काल (28 मार्च) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास महंमद शेख (40) यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.

29/03/2020,1:15PM
Picture

किर्गिस्थानमध्ये महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकले

किर्गिस्थानमध्ये महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकले आहेत. एमबीबीएस करण्यासाठी हे विद्यार्थी गेले होते. नाशिक जिल्ह्यातील 140 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. किर्गिस्थान संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे 15 दिवसांपासून हे विद्यार्थी एका हॉस्टेलमध्ये अडकून आहेत. खाण्यासाठीअन्नही नसल्याने या विद्यार्थ्याचे हाल होत आहेत. भारत सरकारने आम्हाला मदत करावी अशी विनवणी हे विद्यार्थी करत आहेत.

29/03/2020,1:08PM
Picture

कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईहून दुचाकीने गावी येत असताना अपघात, आई-वडिलांसह लहान मुलाचा मृत्यू

कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईहीन दुचाकीने गावी येत असताना दुचाकी घसरल्याने भीषण असा अपघात झाला आहे. या अपघातात आई-वडिलांसह लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घठना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील जांबूर येथे घडली. सर्जेराव भीमराव पाटील, पुनम सर्जेराव पाटील आणि अभय सर्जेराव पाटील अशी मृतांची नावं आहेत.

29/03/2020,11:03AM
Picture

वसई-विरारमधील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ

वसई-विरारच्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वसई-विरारमध्ये तब्बल पाच रुग्ण आढळले आहेत. नव्याने नव्याने आढळले तीन रुग्ण हे दुसऱ्या रुग्णाच्या सहवासातील मित्र आहेत. सध्या यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

29/03/2020,10:59AM
Picture

औरंगाबाद शहरातही कोरोना टेस्ट लॅब सुरू

औरंगाबाद शहरातही कोरोना टेस्ट लॅब सुरु झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार कोरोना नमुन्यांची तपासणी होणार आहे. मराठवाड्यातील कोरोना नमुन्यांची चाचणी आता घाटी रुग्णालयात होणार आहे.

29/03/2020,10:55AM
Picture

पुण्यात मटण आणि चिकन मार्केटला गर्दी

पुण्यात मटण आणि चिकन मार्केटला खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी झाल्याचे दिसत आहे. चिकन 180 ते 200 रुपये किलो तर मटण 700 रुपये किलो आहे. सोशल डिस्टन्स ठेवून मटण-चिकन विक्री सुरु आहे.

29/03/2020,10:51AM
Picture

पिंपरी चिंचवडमध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवडमध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांचे रुग्णालयातील नर्स, डॉक्टर आणि स्टाफ यानीं टाळ्या वाजवून निरोप दिला. आतापर्यंत पिंपरीत एकूण आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात एकूण 12 रुग्ण होते त्यापैकी 4 रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत.

29/03/2020,10:47AM
Picture

नागपूर कारागृहात कोरोनाचा संशयित रुग्ण

नागपूर कारागृहातील कैदीही कोरोनाचा संशयित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. 40 वर्षीय कैद्याला सर्दी, खोकला आणि ताप आहे. या कैद्याला मेडिकलमध्ये दाखल केले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. लवकरच त्याचा रिपोर्ट समोर येईल.

29/03/2020,9:33AM
Picture

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 वर पोहोचली

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 24 वर पोहोचली आहे. इस्लामपूरमधील ज्या कुटुंबात कोरोनाची लागण झाली आहे त्याच कुटुंबातील बाळाला आता कोरोनाची लागण झाली आहे.

29/03/2020,9:29AM
Picture

कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला

29/03/2020,8:56AM
Picture

नागपूरकरांना दिलासा, कोरोनाचे आणखी दोन रुग्ण बरे

नागपूरकरांना दिलासादायक बातमी, कोरोनाचे आणखी दोन रुग्ण बरे, मेडीकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन्ही रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, दोन्ही रुग्णांना डिचार्ज, नागपूरातील आतापर्यंत तीन रुग्ण कोरोनामुक्त

29/03/2020,8:53AM
Picture

नाशिकमध्ये अन्न व पुरवठा विभागाच्या पथकाचे 37 दुकानांवर छापे, 2 दुकानं सील

29/03/2020,8:02AM
Picture

पुणे मार्केट यार्ड आजपासून (29 मार्च) पूर्ववत सुरु

29/03/2020,7:59AM
Picture

मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावर तैनात सीआयएसफच्या हेड कान्स्टेबलला कोरोनाची लागण

मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावर तैनात सीआयएसफच्या हेड कान्स्टेबलला कोरोनाची लागण, मुंबईच्या एका रुग्णालयात मागील काही दिवसांपासून उपचार सुरु, विमानळावर ड्यूटीवर असताना लागण झाल्याची शक्यता

29/03/2020,7:46AM
Picture

मिरा रोड येथील काशीमिरामध्ये कामगारांची बेकायदेशीर वाहतूक

मिरा रोड येथे काशीमिरामध्ये धक्कादायक प्रकार, देशात संचारबंदी असतानाही ट्रक व पिकअप वाहनांमधून माणसांची वाहतूक, उत्तर प्रदेश, सातारा व अन्य राज्यात जाण्याचा प्रयत्न, काशीमिरा पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेश , सातारा येथे लोकांना घेऊन जाणारे 5 ट्रक आणि टेम्पो, सुमारे 150 लोकांना वाहनांमधून उतरवून परत पाठवले, सर्व कामगार मीरा भाईंदर आणि मुंबईतून आपआपल्या गावी निघाले होते, कामधंदे बंद असल्याने उपासमारीची वेळ आल्याची कामगारांची तक्रार

29/03/2020,7:42AM
Picture

मुंबई-नाशिक महामार्गावर हजारो नागरिकांच्या रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावर हजारो नागरिकांच्या रांगा, आसनगावजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, प्रत्येक गाडीची तपासणी, मुंबई, ठाणे, भिवंडीवरुन आलेल्या गाड्या तपासून परत पाठवल्या, जवळ अडीच ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा

29/03/2020,7:35AM
Picture

शहापूरमध्ये होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल, शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई, संचारबंदी व कोरोना उपाययोजना कलमचा भंग केल्याचा आरोप, वारंवार सूचना देऊनही बाहेर फिरणं भोवलं

29/03/2020,7:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *