अनेकजण विचारतात या परिस्थितीत आम्ही काय करु, मी म्हणतो ... : उद्धव ठाकरे

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे (Uddhav Thackeray on Corona Virus prevention).

Uddhav Thackeray on Corona Virus prevention, अनेकजण विचारतात या परिस्थितीत आम्ही काय करु, मी म्हणतो … : उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे (Uddhav Thackeray on Corona Virus prevention). अनेकजण या परिस्थितीत आम्ही काय करु असं विचारतात. त्यांनी काहीही करु नये. केवळ घराबाहेर पडू नका, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज दिवसभरातील कोरोना नियंत्रणाचा आढावा घेत याची माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण जे सहकार्य करत आहात त्यात अजून एक पाऊल पुढे टाका. शक्यतो घराबाहेर पडू नका. तेवढं एकच काम करा. अनेकजण विचारतात आम्ही काय मदत करु. मी त्यांना सांगतो घरी राहा, बाकी काही करु नका. या संकटावरही आपण यशस्वीपणे मात करु. त्यासाठी तुमचं जे सहकार्य मिळत आहे ते असंच मिळत राहो. संकट गंभीर आहे, सरकार खंबीर आहे.”


या संकटावर मात करण्यासाठी सर्वच बाजूंनी हात पुढे येत आहेत. त्या सर्व हातांचं मी स्वागत करतो. आपण एकजूटीने या संकटाचा मुकाबला करतो आहे. मी पुन्हा पुन्हा हेच सांगेल की जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत कुणीही अडथळा आणू नका. अनावश्यक प्रवास टाळा. स्वतःच्याच घरी राहा. सरकारी यंत्रणांवरील ताण वाढेल असं काही करु नका. बाकी इतर सुचना सरकारच्यावतीने तुम्हाला दिल्या गेल्या आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“केवळ टेहाळणी करायला किंवा फेरफटका मारायला बाहेर पडू नका”

उद्धव ठाकरे म्हणाले, “शहरांमध्ये जीवनावश्यk वस्तूंची ने-आण बंद नाही. ज्या कंपन्या किंवा  सकाळ झाली की आपल्याला भाजी, धान्य, औषधं आणण्यासाठी बाहेर पडावं लागतं. आपणही समजुतीने घ्या. यासाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी त्याची खात्री करुन समजून घ्यावं. नागरिकांनाही मी सांगतो की केवळ टेहाळणी करायला किंवा फेरफटका मारायला बाहेर पडू नका. घरात राहा, सुरक्षित राहा. घर हेच आपल्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.“

जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्यांनी पोलिसांना 100 क्रमांकावर संपर्क करावा. पोलिस तुम्हाला पूर्ण मदत करतील. मी पोलिसांचे विशेष कौतुक करतो. त्यांनी काही लाख मास्क धाड टाकून जप्त केले. या संकटाचा कुणी संधी म्हणून उपयोग करु नये. काळाबाजार, साठेबाजी होऊ नये. मी याबाबत बैठक घेतली आहे. आपण काळजी करण्याची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा धान्यसाठा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातमी :

संकट मोठं, समजुतदारपणा वाढवा, मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

संबंधित व्हिडीओ:


Uddhav Thackeray on Corona Virus prevention

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *