कोरोना संक्रमित माताही करू शकते नवजात बाळाला स्तनपान; काळजी काय घ्यायची? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 04, 2021 | 9:48 AM

कोरोना झालेली आई आपल्या नवजात बाळाला स्तनपान करू शकते का? याबाबत अजूनही अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना झालेली माताही आपल्या बाळाला स्तनपान करू शकते, असं म्हटलं आहे. (Breastfeeding With Coronavirus)

कोरोना संक्रमित माताही करू शकते नवजात बाळाला स्तनपान; काळजी काय घ्यायची? वाचा सविस्तर
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई: कोरोना झालेली आई आपल्या नवजात बाळाला स्तनपान करू शकते का? याबाबत अजूनही अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना झालेली माताही आपल्या बाळाला स्तनपान करू शकते, असं म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. मुलाला जवळ घेण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवून सॅनिटाईज करून घेतलं पाहिजे. तोंडाला मास्क लावलं पाहिजे. संक्रमण अधिक असेल तर एक्सप्रेस मिल्कचाही वापर केला जाऊ शकतो. (Breastfeeding With Coronavirus; What Are The Precautions For Covid 19 Positive Mother?)

डिलिव्हरीनंतर मुलाला जवळ घेण्यास काही हरकत नाही. त्यामुळे स्किन टू स्किन संपर्क होतो. त्यामुळे मुलाच्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे बाळ दगावण्याचा धोका कमी होतो. तसेच आईची छाती भरून येते व दूध यायला सुरुवात होते. स्तनपान केवळ बाळासाठी फायदेशीर आहे, असं अनेक मातांना वाटतं. पण तसं नाही. स्तनपान केल्याने बाळालाच नाही तर मातेलाही त्याचा फायदा होत असतो. बाळंतपणामुळे स्त्रियांचं वजन वाढतं. मात्र, स्तनापानामुळे त्यांचं वजन नियंत्रित होतं. डायबिटीज, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका टळतो. तसेच भविष्यात हाडे ठिसूळ करणारे आजार म्हणजे ऑस्टियोपोरोसिसची शक्यता आणि पोस्ट प्रेग्नेंसी ब्लीडिंग सुद्धा कमी होत असल्याचं जसलोक रुग्णालयाच्या डॉ. मानसी शाह यांनी सांगितलं. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

व्हॅक्सिन घेण्याआधी नंतरही स्तनपान सुरू ठेवा

स्तनपान सुरू ठेवा: कोरोनाची व्हॅक्सिन घेतल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते. स्तनपानाद्वारे ते बाळापर्यंत पोहोचतं. त्यामुळे बाळाची इम्युनिटी वाढते.

8-10 ग्लास पाणी प्या: व्हॅक्सिन घेण्यापूर्वी आणि नंतरही शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. शरीरात पुरेसं पाणी असायला हवं. त्यामुळे मातेला इतर आजार आणि व्हॅक्सिनचे साईड इफ्केट्स होत नाहीत.

सुपरफूड भरपूर घ्या: साईड इफेक्ट्स पासून वाचायचं असेल तर इम्युनिटी स्ट्राँग होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजीपाला, हळद आणि लसूण सारखे सुपर फुडचा तुमच्या आहारात समावेश करा. तसेच संत्री, मोसंबीसारखे व्हिटामिन-सी असलेली फळंही मोठ्या प्रमाणावर खा.

पुरेशी झोप घ्या: तज्ज्ञांच्या मते महिलांनी पुरेशी झोप घेतली तर स्तनपानानंतर त्यांना थकवा जाणवत नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर शरीरात इम्युनिटी वेगाने वाढण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यामुळे 8 तास झोप घेतली पाहिजे.

हलका व्यायाम करा: त्याशिवाय हलकाफुलका व्यायामही करा. किंवा वॉक केला तरी चालेल. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. त्यामुळे व्हॅक्सिनचे साईट इफेक्ट्स होत नाहीत.

स्तनपान कधी करू नये

जर आई एड्सबाधित असेल किंवा टीबी रुग्ण असेल किंवा कँसर झालेला असून केमोथेरपी घेत असेल तर स्तनपान करू नये. तसेच नवजात बाळाला ग्लॅक्टोसीमिया नावाचा आजार झाला असेल तर बाळाला दूध पाजू नये. हा एक दुर्मिळ आजार आहे. हा आजार झालेली मुलं दुधातील साखर पचवू शकत नाहीत. त्याशिवाय मायग्रेन, पार्किंसन किंवा वाताची औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

मद्यसेवनापासून दूर राहा

मद्यपानापासून दूर राहा. कारण त्यामुळे इम्यून रिस्पॉन्स कमी होतो. त्यामुळे शरीरात दारुची मात्रा अधिक असेल तर ते स्तनपानाद्वारे मुलापर्यंत पोहोचतं. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. (Breastfeeding With Coronavirus; What Are The Precautions For Covid 19 Positive Mother?)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 10 हजारांनी घट, अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्येही घसरण

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या कोविड रुग्णांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक; इंग्लंडच्या संशोधकांचा दावा

पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा सर्वाधिक धोका, लक्षणे तापासारखीच; साचलेल्या पाण्यात जाऊ नका

(Breastfeeding With Coronavirus; What Are The Precautions For Covid 19 Positive Mother?)