मुलांना हेल्दी, गुबगुबीत आणि उंच बनवायचं असेल तर मुलांना ब्रोकोली राइस द्यायलाच हवा!

| Updated on: Jan 31, 2022 | 6:56 PM

जर तुम्ही मुलांसाठी हेल्दी पदार्थ बघत असाल तर ब्रोकोलीची रेसिपी अत्यंत उपयुक्त ठरते. ब्रोकोलीचा समावेश पौष्टिक भाज्यांच्या श्रेणीत होते. ब्रोकोलीमध्ये माइक्रोन्यूट्रिएंटस आणि फाइटोकेमिकल असतात. ही दोन्ही तत्व बाळाला स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मुलांच्या आहारात ब्रोकलीचा समावेश नक्की करा. जेणेकरून तुमचे मुल स्वस्थ, गुबगुबीत होईल आणि मुलाची उंची वाढण्यासही मदत होईल.

मुलांना हेल्दी, गुबगुबीत आणि उंच बनवायचं असेल तर मुलांना ब्रोकोली राइस द्यायलाच हवा!
ब्रोकोली
Follow us on

ब्रोकोलीचा पौष्टीक भाज्यांच्या श्रेणीत होते. मोठी माणसं नव्हे तर लहान मुलांनाही ब्रोकोली (Broccoli) आवडते. सूप, भाजी आणि भातामध्ये ब्रोकोली वापरता येते. यामध्ये माइक्रोन्यूट्रिएंटस आणि फाइटोकेमिकल असतात. ही दोन्ही तत्व बाळाला स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मुलांच्या आहारात ब्रोकलीचा समावेश नक्की करा. या लेखाच्या माध्यमातून ‘ब्रोकोली राईस’ (Broccoli Rice) बनवण्याची रेसिपी शेअर करतोय. सोबतच ब्रोकोलीचे फायदे समजून घ्या. राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार बाळ 6 महिन्याचे (6 Month Old Baby) झाल्यानंतर त्यांना ब्रोकोली खाऊ घालता येते. सुरुवातीला ब्रोकोलीची प्यूरी करा किंवा उकळलेली ब्रोकोली मँश करून खाऊ घाला. नंतर हळूहळू ब्रोकोलीला दुसऱ्या भाज्यांसोबत ब्लेंड करून घ्या. 9 महिन्यांनंतर बाळ ब्रोकोलीचे छोटे-छोटे तुकडे खाऊ शकतात. ब्रोकोली माइक्रोन्यूट्रिएंटसचा स्रोत असल्याने यामध्ये के, बी 6, बी 9, बी 2, सी जीवनसत्त्वे असतात. 45 ग्रँम कच्ची ब्रोकोली बाळाचा दररोज आवश्यक असणारे पोषणाची गरज पूर्ण करू शकते.

ब्रोकोली राईससाठी लागणारे साहित्य:

शिजवलेला भात 1 कप, 1/2 कप ब्रोकोली ( किसलेली), 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्ची, 1 लसणाची पाकळी, 2 चमचे बारीक चिरलेला कोथंबीर, 1 चमचा लिंबूचा रस, 1/4 चमचे मीठ, 1/4 जिरे, 1/8 चमचे काळी मिरे पावडर आणि एक्स्ट्रा व्हर्जिन आॉइल.

ब्रोकोली राईस बनवण्याची कृती : एका पँनला मंद आचेवर गरम करा.आता पँनमध्ये अॉलिव्ह अॉईल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर जीरे, ब्रोकली, कांदा, लसूण आणि तिखट टाकून परतून घ्या. नंतर मीठ आणि कोथंबीर घालून परतून घ्या. 5 ते 8 मिनिटांपर्यंत भात परतवून घ्या. जेणेकरून कांदा आणि ब्रोकोली शिजून जाईल.

ब्रोकोली राइस बनवण्याच्या स्टेप्स :

पँनवरून कढई उतरला आणि वरून लिंबू पिळून मिश्रण एकजीव करा. आता या मिश्रणाला भातात एकजीव करू घ्या. ब्रोकोला राइस तयार. ब्रोकोली राइस मुलांना खाऊ घाला. यामध्ये तुम्हाला हवे असे तर भाज्या घालू शकता. यामुळे मुलांचे पोषण वाढेल आणि उंची वाढेल.

इम्युनिटी वाढवतो ब्रोकोली :

ब्रोकोलीतील अँन्टी-इफ्लामेंट्री, अन्टीकॉक्सिड आणि कार्डियोप्रोटेक्टिव्ह गुण असतात. यामध्ये सिलेनियम आणि व्हिटॅमिन सी आणि फाइटोकेमिकल असतात. ही सर्व तत्व हळूहळू इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवतात. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे शरीरात कोलाजन तयार होण्यास मदत होते. यामुळे धमन्या, शरीर आणि त्वचेला सपोर्ट मिळतो.

हाडांना करतो मजबूत:

कच्च्या ब्रोकोलीमध्ये 21.2 मिलीग्रँम कँल्शियम, 9.45 मिलिग्रँम मँग्नेशिअम, 29.7 मिलीग्रँम फॉस्फरस आणि 142 मिलीग्रँम पोटँशियम असते. ही पोषक तत्व हाडांना मजबूत करतात.

टीम- सगळ्यांच मुलांना ब्रोकोली राईस द्यायलाच हवा, असा काही नियम नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरुन नका. काही वेळेस ऍलर्जी झाल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

संबंधित बातम्या :

‘वर्क फ्रॉम होम’मुळे शरीराला जडपणा आलाय… हे पदार्थ उपयुक्त ठरतील

आरोग्यासाठी पालक आहे सर्वात फायदेशीर; मात्र ‘या’ लोकांनी टाळावे सेवन

आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे