कोरोनामुक्त होण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टीचा समावेश करा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

| Updated on: May 09, 2021 | 8:48 PM

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विट करत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा हे सांगितले आहे. (corona virus healthy food harsh vardhan)

कोरोनामुक्त होण्यासाठी आहारात या गोष्टीचा समावेश करा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
healthy food
Follow us on

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. रुग्ण तसेच मृतांचे प्रमाण वाढत असल्यामुळे काय काळजी घ्यावी याचा सल्ला अनेक तज्ज्ञ व्यक्ती देतायत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आराहासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय आहार घ्यावा हे सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योगा करा असासुद्धा सल्ला दिलाय. (central health minister Harsh Vardhan given healthy food list to fight with Corona virus)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश अडचणीत सापडला आहे. देशात कोरोनामुळे रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या येतायत. मात्र, असे असले तरी मृतांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वात आधी कोरोनाला न घाबरता त्याचा सामना करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जातेय. तसेच, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर योग्य आहार तसेच काही नियम पाळल्यानंतर लवकरच पुन्हा कोरोनामुक्त होण्यास मदत मिळते. वेळेवर पौष्टिक आहार घेणारे, नियमित व्यायाम करणारे तसेच तणावमुक्त राहणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास ते लवकर बरे होतायत. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता हर्षवर्धन यांनी आपल्या आहारामध्ये कशाचा समावेश असावा याबद्दल माहिती दिली आहे.

आहारामध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा

डॉ. हर्षवर्धन यांनी सध्याच्या कारोनाकाळात आहारामध्ये कशाचा समावेश असावा याबद्दल सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी प्रतिकाशक्ती, उर्जा निर्माण करणाऱ्या अन्नाचे सेवन करावे असं आपल्या ट्विटरमध्ये सांगितलंय. तसेच प्रोटीन्ससाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करावा. फॅट्ससाठी अक्रोड, बदाम, ऑलिव्ह, मोहरीचे तेल खावे, असे हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटरमध्ये सांगितलंय.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदयुक्त दूध प्या

पुढे सांगताना हर्षवर्धन यांनी व्हिटॅमिन्ससाठी वेगवेगळ्या फळाचा तसेच भाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा, असा सल्ला दिला आहे. तनावमुक्त राहण्यासाठी कोकोयुक्त डार्क चॉकलेट खाण्याचे त्यांनी सांगितले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही मिसळलेलं दूध घ्यावं, असंसुद्धा हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नियमित योगा, प्राणायाम करण्याचासुद्धा देशवासीयांना सल्ला दिला आहे.

इतर बातम्या :

Health Tips : पचनशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा, वजनही वेगाने कमी होणार !

Corona Pandemic : कोरोनापासून लढण्यासाठी DRDO च्या आणखी एका औषधाला मंजुरी, कसं ठरतं उपयुक्त?

वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी, जाणून घ्या याचे अनेक फायदे

(central health minister Harsh Vardhan given healthy food list to fight with Corona virus)