AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cold Drinks in Alcohol : दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते पण हे वाचल्यानंतर अशा मिक्सिंगने पिण्याआधी 10 वेळा विचार करालं

Cold Drinks in Alcohol : दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते. आरोग्याचं नुकसान कमी होतं, असं म्हणतात. पण हे वाचल्यानंतर दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळून पिण्याआधी 10 वेळा विचार कराल.

Cold Drinks in Alcohol : दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते पण हे वाचल्यानंतर अशा मिक्सिंगने पिण्याआधी 10 वेळा विचार करालं
Cold Drinks in Alcohol
| Updated on: Dec 07, 2025 | 5:36 PM
Share

Can You Mix Cold Drinks in Alcohol : अनेकदा तुम्ही लोकांना दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्स मिसळून पिताना पाहिलं असेल. दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते. आरोग्याचं नुकसान कमी होतं, असं म्हणतात. खरंतर दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळून पिण्याची आयडीया चांगली नाही. त्यामुळे आरोग्याचं उलटं जास्त नुकसान होतं. कारण कोल्ड ड्रिंकमध्ये कॅफीन, कॅलोरी आणि शुगरसह अनेक गोष्टी असतात. अल्कोहलमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळून पिल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. या बद्दल सगळ्यांनी सत्य समजून घेतलं पाहिजे.

क्लीवलँड क्लीनिकच्या एका रिपोर्टनुसार, कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक आणि सोड्यामध्ये कॅफीनच प्रमाण जास्त असतं. जेव्हा तुम्ही दारुमध्ये हे ड्रिंक्स मिसळता, तेव्हा लिमिटपेक्षा जास्त पिऊन जाता. कॅफीन स्टिम्युलेंटसारखं काम करतं. तुम्हाला हाय वाटतं. तुम्ही नॉर्मल कंडीशनमध्ये आल्यानंतर पुन्हा पिण्याची इच्छा होते. कॅफीन खूप एडिक्टिव असतं. हे दारुत मिसळून प्याल्यामुळे दारुची सवय लागू शकते. कॅफीनमुळे शुद्ध राहत नाही. दारु पिताना जास्त ड्रिंक केलीय हे कळतच नाही.

हे कॉम्बिनेशन जीवघेणं ठरु शकतं

दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक मिसळून पिणं ह्दयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही. कॅफीन आणि अल्कोहल दोघांचा ब्लड प्रेशरवर वेगवेगळा परिणाम होतो. दोन्ही गोष्टी मिसळून तुम्ही जेव्हा पिता, तेव्हा यामुळे बीपी वर-खाली होऊ शकतो. हार्टच नुकसान होऊ शकतं. ज्यांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांच्यासाठी दारुमध्ये कोल्ड ड्रिंक धोकादायक ठरु शकतं. हे दोन्ही मिसळून पिल्यामुळे आपल्या ब्लड वेसल्स आकुंचन पावतात. त्यामुळे वॅस्कुलर फंक्शनमध्ये अडचणी येऊ शकतात. हार्टच्या पेशंटसाठी हे कॉम्बिनेशन जीवघेणं ठरु शकतं.

कॅलोरी किती वाढतात?

कोल्ड ड्रिंक्समध्ये कॅलोरी आणि शुगरची मात्रा भरपूर जास्त असते. दारुमध्ये मिसळल्यानंतर कॅलोरी काउंट आणखी वाढतो. एक्सपर्ट्सनुसार, अल्कोहलच्या एका ड्रिंकमध्ये जवळपास 100 ते 500 कॅलोरी असतात. यात कोल्ड ड्रिंक मिसळल्यानंतर कॅलोरी काऊंट प्रमाणापेक्षा जास्त वाढतो. तुम्ही दोन-तीन पेग मारल्यानंतर कॅलोरी काउंट 900 पर्यंत जाऊ शकतो. अत्याधुनिक कॅलोरी आणि शुगरमुळे लठ्ठपणा,डायबिटीज आणि डायजेशन संबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. डायबिटीजच्या रुग्णांनी दारु आणि कोल्ड ड्रिंक मिसळून कधी पिऊ नये.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....