दारूसोबत सर्वात बेस्ट चकणा कोणता? 99 टक्के लोकांना माहीत नाही उत्तर
दारू जरी शरीरासाठी हानिकारक असली तरी देखील अनेक जण दारू पितातच, पण तुम्हाला हे माहिती आहे का? दारूसोबत सर्वात बेस्ट चकणा कोणता असू शकतो. नसेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी

दारूप्रेमींचं एक वेगळंच जग असतं, दारू कोणत्या औषधापेक्षा कमी नाही असंही अनेकदा बोलता -बोलता मद्यप्रेमी बोलून जातात. मात्र दुसरीकडे आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टर दारू शरीरासाठी हानिकारक असल्याचं सांगतात. मात्र जे लोक दारू पितात ते आरोग्याच्या काही विशिष्ट समस्यांसाठी विस्की आणि रम पिण्याचा सल्ला देतात. अनेकांचं असंही म्हणणं असतं की, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रम पिणं हे शरीरासाठी फायद्याचं असतं. थंडीच्या दिवसांमध्ये दारू पिल्यास शरीर उबदार राहातं, थंडीचा त्रास होत नाही. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये दारू पिल्यास सर्दी सारखे आजार देखील होत नाही, असा दावा देखील अनेकांकडून करण्यात येतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का? दारू सोबत काय खायला पाहिजे आणि काय खाणं टाळलं पाहिजे? अनेक जण दारू पिताना चकणा म्हणून विविध प्रकारचं नमकीन, चाऊमीन, चिप्स किंवा मांसाहारी पदार्थांचं सेवन करतात. मात्र असं करणं खरच शरीरासाठी फायद्याचं आहे का? की या पदार्थांमुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
गोयल साहब के नुस्खे नावाच्या इंन्स्टाग्राम पेजवर डॉ. सुभाष गोयल यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात दारूचं सेवन करणं शरीरासाठी हानिकारकच आहे. मात्र असं असूनही जर तुम्ही दारू पित असाल तर दारूसोबत तुम्ही काय खाता? चला आज मी तुम्हाला सांगतो दारूसोबत कोणता चकणा हा सर्वोत्तम आहे, तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही फायद्याचा आहे. गोयल पुढे या व्हिडीओमध्ये म्हणतात, दारू पित असताना सोबत खाण्यासाठी नेहमी हेल्दी फूड ठेवायला पाहिजे. दारू पिताना तुम्ही पनीर खा, सॅलड खा, सोबतच तुम्ही भाजलेले किंवा उकडलेले चणे देखील खाऊ शकता.
काही लोकांना दारूसोबत मांसाहारी पदार्थ खाण्याची सवय असते. तर काही जण दारूसोबत तळलेले पदार्थ जसे की समोसे, भजे किंवा चिप्स खातात. मात्र ही चुकीची पद्धत आहे. असे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचं जास्त नुकसान होऊ शकतं, मात्र त्याऐवजी तुम्ही जर हेल्दी फूड खाल्ल तर थोडं कमी नुकसान होईल. दारूमुळे तर तुमच्या शरीराचं नुकसान होणारच आहे, हिस्की सारखे मद्य पिताना काही तिखट, आंबट असे पदार्थ खाण्यापेक्षा सॅलड खालेलं कधीही उत्तम असंही त्यांनी म्हटलं आहे.
