AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इराणवर पाकिस्तानसारखाच सर्जिकल स्ट्राईक? अमेरिकेचा खतरनाक प्लॅन लीक, संरक्षण तज्ज्ञ काय म्हणाले?

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियात युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईकचा प्लॅन आणि इराणची 'अंडरग्राउंड' लष्करी शक्ती, तसेच या संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम यावर नागपूरचे संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांनी केलेले सखोल विश्लेषण.

आता इराणवर पाकिस्तानसारखाच सर्जिकल स्ट्राईक? अमेरिकेचा खतरनाक प्लॅन लीक, संरक्षण तज्ज्ञ काय म्हणाले?
us iran war
| Updated on: Mar 15, 2026 | 7:49 AM
Share

पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत स्फोटक बनली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात चाललेला संघर्ष आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ मुत्सद्देगिरीने काम भागणार नाही, असे चित्र दिसत आहे. संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांच्या मते अमेरिकेकडून इराणविरोधात हाय-प्रोफाईल लष्करी कारवाईची तयारी सुरू आहे. याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सध्या इराणमधील सर्वोच्च नेतृत्वाच्या (High-Value Targets) हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जर अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचे नेमके लोकेशन मिळाले, तर तिथे थेट विशेष दलांच्या (Special Forces) माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकतो. २०११ मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता, तशाच प्रकारच्या धाडसी मोहिमेची शक्यता सध्या संरक्षण वर्तुळात चर्चिली जात आहे, असे अभय पटवर्धन यांनी सांगितले.

उत्तर कोरिया इराणच्या मदतीला

या संघर्षात आता केवळ दोन देश उरलेले नसून, जागतिक शक्तींचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. एका बाजूला अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र आहेत, तर दुसरीकडे इराण, रशिया, चीन आणि उत्तर कोरिया हा नवा गट (Axis of Resistance/Cooperation) तयार झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाला शस्त्रे आणि सैनिक पुरवल्यानंतर आता उत्तर कोरियाने इराणच्या मदतीला धावून येण्याचे संकेत दिले आहेत. किम जोंग-उन यांच्याकडून इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) च्या चाचण्या करून अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीनने या भागात आपली प्रगत क्षेपणास्त्रे तैनात करण्याबाबत चर्चा सुरू केली असून, आर्थिक आणि तांत्रिक मदतीद्वारे तो इराणची बाजू भक्कम करत आहे, असेही अभय पटवर्धन म्हणाले.

इराणला नमवणे इतके सोपे नाही

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ वापरण्याचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे. हा जगातील सर्वात शक्तिशाली गैर-अण्वस्त्र बॉम्ब मानला जातो. मात्र, इराणला नमवणे इतके सोपे नाही. गेल्या २० वर्षांत इराणने आपली लष्करी पायाभूत सुविधा पूर्णपणे ‘भूमिगत’ (Underground) केली आहे, असे अभय पटवर्धन यांनी सांगितले.

इराणने पर्वतरांगांमध्ये खोलवर मिसाईल साठे, कमांड सेंटर्स आणि लाँचिंग साईट्स विकसित केल्या आहेत. इराणचे सैन्य अचानक जमिनीबाहेर येऊन हल्ला करते आणि काही क्षणांत पुन्हा भूमिगत होते. या रणनीतीमुळे अमेरिकेच्या उपग्रहांनाही त्यांचे नेमके स्थान शोधणे कठीण होत आहे, असेही अभय पटवर्धन यांनी म्हटले.

इराण हा लष्करीदृष्ट्या सक्षम देश

व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला होता. इराण हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि लष्करीदृष्ट्या सक्षम देश आहे. त्यामुळे तिथे पूर्णवेळ सैन्य कारवाई (Full-scale Ground War) करणे अमेरिकेसाठी आर्थिक आणि मानवी दृष्टीने अत्यंत महागडे ठरू शकते. म्हणूनच अमेरिका सध्या केवळ ‘कडक इशारा’ देण्याच्या किंवा ‘टार्गेटेड’ हल्ल्यांच्या रणनीतीवर भर देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, असेही त्यांनी म्हटले.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल