आम्लपित्त, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दही की ताकाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर?

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या सामान्य होत चालेल्या आहे. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळावण्यासाठी दही की ताक यापैकी कोणता पर्याय फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊयात.

आम्लपित्त, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दही की ताकाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर?
curd or buttermilk
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 13, 2026 | 1:17 PM

भारतीय जेवणात दही आणि ताक दोन्हींचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक घरांमध्ये जेवणासोबत दही आणि भात खाण्याची किंवा ताक मोठ्या आवडीने सेवन करतात. हे दोन्ही प्रकार दुधापासून बनवलेले नैसर्गिक प्रोबायोटिक पदार्थ आहेत, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. परंतु लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता असलेल्या व्यक्तीने दही खावे की ताक प्यावे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

दही आणि ताक फायदेशीर का मानले जातात?

पोषणतज्ञांच्या मते दही आणि ताक दोन्हीमध्ये प्रोबायोटिक्स असतात. हे चांगले बॅक्टेरिया आहेत जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. जेव्हा पचनक्रिया चांगली असते तेव्हा पोटाशी संबंधित अनेक समस्या आपोआप कमी होतात. याव्यतिरिक्त दही आणि ताकमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि शरीराला बळकटी देण्यास मदत करणारे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

आम्लपित्ताची समस्या असल्यास कोणता पदार्थ सेवन करणे चांगले ठरेल?

जेव्हा आम्लपित्तांची समस्या सतावते तेव्हा ताक हा एक चांगला पर्याय मानला जातो. ताक हे हलके आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ताक प्यायल्याने पोट थंड राहते आणि पोटात जळजळ किंवा जडपणा कमी होतो. बरेच लोकं ताकात भाजलेले जिरे, काळे मीठ किंवा पुदिना मिक्स करून सेवन करतात. यामुळे गॅस आणि आम्लपित्तपासून आणखी आराम मिळू शकतो.

दही पोटासाठी देखील फायदेशीर आहे, परंतु जास्त आंबट दही काही लोकांमध्ये आम्लपित्त वाढवू शकते. म्हणून जर तुम्हाला आम्लपित्तचा त्रास होत असेल तर ताजे दही कमी प्रमाणात सेवन करणे किंवा ते पातळ करून ताक म्हणून पिणे चांगले ठरेल.

बद्धकोष्ठतेसाठी कोणता चांगला पर्याय आहे?

दही आणि ताक दोन्ही बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी उत्तम मदत करू शकतात. त्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुधारते. तसेच ताक हलके असते आणि शरीराला हायड्रेट देखील ठेवते. म्हणूनच बरेच लोकं ताक पिऊन बद्धकोष्ठतेपासून मुक्त होतात.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

  • नेहमी ताजे दही किंवा ताजे ताक प्या.
  • खूप आंबट किंवा जुने दही खाणे टाळा.
  • रात्री जास्त दही खाल्ल्याने काही लोकांना पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • फक्त संतुलित प्रमाणात सेवन करा.

एकंदरीत आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांसाठी ताक हा सौम्य आणि अधिक फायदेशीर पर्याय मानला जातो, तर ताजे दही मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते पचन आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us