AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI : मुंबईने टॉस जिंकला, रोहित-धोनीचं कमबॅक? पाहा प्लेइंग ईलेव्हन

Chennai Super Kings vs Mumbai Indians Toss and Playing 11 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.

CSK vs MI : मुंबईने टॉस जिंकला, रोहित-धोनीचं कमबॅक? पाहा प्लेइंग ईलेव्हन
CSK vs MI Toss IPL 2026Image Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 02, 2026 | 8:36 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर होम टीम चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान आहे. मुंबई आणि चेन्नई यांचा हा या हंगामातील एकूण नववा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  चेन्नई आणि मुंबईची 19 व्या हंगामात आमनसामने येण्याची दुसरी वेळ आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी दिलीय आणि कुणाला बाहेर केलंय हे जाणून घेऊयात.

चेन्नईकडून मॅचविनर गोलंदाजाला बाहेरचा रस्ता

चेन्नईने मुंबई इंडियन्सनवर 23 एप्रिलला 103 धावांनी विजय मिळवला होता. अकील हौसेन याने 208 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला 104 वर गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. अकीलने मुंबईला 4 झटके दिले होते. मात्र याच अकीलला आता प्लेइंग ईलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. तसेच गुरजनप्रीत सिंह यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांच्या जागी रामकृष्ण घोष आणि अकील होसेन यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबईने अश्वनी कुमार याला बाहेर केलं आहे. तर क्रिश भगत याचं कमबॅक झालं आहे. तर रघु शर्मा याचं आयपीएल पदार्पण झालं आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान चेन्नई आणि मुंबईची या मोसमात काही प्रमाणात सारखीच स्थिती आहे. चेन्नईने 8 पैकी 5 सामने गमावले आहेत. तसेच चेन्नईला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई पॉइंटस टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. तर मुंबईला 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर मुंबईला 6 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू हे दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहेत. महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे या मोसमात आतापर्यंत एकही सामन्यात खेळता आलेलं नाही. तर रोहित आरसीबी विरुद्ध झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर आहे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, ट्रेंट बोल्ट, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं