Coronavirus : वाढतोय कोरोनाचा धोका ! मुंबईतील रुग्णांलयात पुन्हा सुरू झाले कोविड वॉर्ड

| Updated on: Mar 27, 2023 | 4:42 PM

महाराष्ट्रात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजारांहून अधिक आहे. ऑक्‍टोबरनंतर प्रथमच सक्रिय प्रकरणे 2000 च्या पुढे गेली आहेत.

Coronavirus : वाढतोय कोरोनाचा धोका ! मुंबईतील रुग्णांलयात पुन्हा सुरू झाले कोविड वॉर्ड
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : देशात कोरोनाचा (corona) धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मुंबई, महाराष्ट्रातही विषाणूचा (corona cases are rising) आलेख सर्वाधिक वाढत आहे. हे पाहता मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये कोविडच्या उपचारासाठी बनवलेले वॉर्ड (covid ward) तब्बल वर्षभरानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. कोविड वॉर्डमध्ये फक्त कोरोना बाधित रुग्णांनाच दाखल केले जाते. त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा आधार असतो. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात हे सर्व रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आले होते. आता विषाणूचा वाढता धोका पाहता कोविड वॉर्ड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजारांहून अधिक आहे. ऑक्‍टोबरनंतर प्रथमच सक्रिय प्रकरणांचा आकडा 2000 च्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मुंबई शहरात कोविडची प्रकरणे वाढत आहेत. गेल्या 24 तासात 123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, ही चिंतेची बाब आहे की रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 43 कोरोना रुग्ण दाखल आहेत. यापैकी 21 जणांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

मुंबईत कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. तब्बल चार महिन्यांनी अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. यासोबतच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा कोविड वॉर्ड सुरू करण्यात येत आहे.

दोन रुग्णालयांत वाढवण्याच आली बेड्सची संख्या

कोविडची वाढती प्रकरणे पाहता मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात 1850 खाटांची वाढ करण्यात आली असून कस्तुरबा रुग्णालयात 30 खाटांची वाढ करण्यात आली आहे. कोविडची वाढती प्रकरणे आणि रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांनी सावध रहावे

कोविड तज्ज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, कोरोना विषाणू पुन्हा वाढत आहे. ते आता हलक्यात घेऊ नये. लक्षणे फारशी गंभीर नसली तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस केसेस वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. लोकांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, तशी वेळ आलीच तर मास्क वापरा, सॅनिटायजरचा वापर करा, वेळोवेळी हात धुवत रहा आणि स्वच्छतेचे नियम पाळा, असा सल्लाही डॉक्टर देत आहेत.