Covid 19 Voice Test | तुमचा आवाजच सांगणार , कोरोना झाली की नाही..लवकरच येणार हे मोबाईल अॅप..

Covid 19 Voice Test | नाक आणि तोंडावाटे कोरोना चाचणीची अडचण आता लवकरच दूर होईल.तुमच्या केवळ आवाजावरूनच तुम्हाला कोरोना झाला की नाही याचा ठावठिकाणा लागणार आहे.

Covid 19 Voice Test | तुमचा आवाजच सांगणार , कोरोना झाली की नाही..लवकरच येणार हे मोबाईल अॅप..
आवाजावरुन कोरोनाचे निदान Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 11:00 AM

Covid 19 Voice Test | जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाविरोधात (Covid -19) लस तयार करण्यात आली आहे. त्याला अटकाव करण्यासाठीही अनेक औषधं बाजारात दाखल झालेली आहे. कोरोनो निदानाचे अनेक पर्यायही समोर आले आहेत. घरबसल्या कोरोना चाचणीची किट (Corona Text Kit) ही आली आहे. तरीही नाक आणि तोंडावाटे कोरोना चाचणीची अडचण आहेच. हा प्रकार काहींना किळसवाणा वाटतो. पण रोगाचे निदान करायचे तर हा प्रकार करावाच लागतो. आता केवळ आवाजावरुनच तुम्हाला कोरोना (Covid 19 Voice Test) झाला की नाही याचे निदान होणार आहे.

लवकरच मोबाईल अॅप

नेदरलँडच्या Maastricht University च्या Institute of Data Science ने हे अॅप विकसीत केले आहे. संशोधनकर्त्यांचा दावा आहे की, केवळ आवाजाच्या नमुन्यावरुनच तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळेल.

एका मिनिटात निदान

हे अॅप विकसीत करणाऱ्या संशोधन टीमचे संशोधक वफा अलजबवी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार, अॅपच्या (App) माध्यमातून केवळ आवाजाच्या सहाय्याने तुम्हाला कोरोना झाला की नाही याचे निदान अवघ्या एका मिनिटात करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

रुग्णांवर चाचणी यशस्वी

मीडियातील अहवालानुसार, या App ची चाचणी यशस्वी झाली आहे. केम्ब्रिज युनिर्व्हसिटीत 4,352 रुग्णांवर याविषयीचे संशोधन करण्यात आले. त्यांच्या आवाजाच्या नमुन्यावरुन त्यांना कोरोना झाली की नाही याची माहिती मिळाली आहे.

कसे करते काम?

संशोधकांच्या दाव्यानुसार, कोरोनाग्रस्ताच्या आवाजात बदल होतो. या आवाजाच्या नमुन्याआधारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलीजेंस (AI)) वापर करुन कोरोनाचे निदान होईल.

आरटी-पीसीआरवर स्वस्त पर्याय

संशोधन टीमचा दावा आहे की, ज्या देशात कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणीचा खर्च महागडा आहे. त्याठिकाणी या अॅपचा मोठा फायदा होईल. अगदी स्वस्तात लोकांना कोरोना झाली की नाही याची माहिती मिळेल. या अॅपच्या माध्यमातून कोरोनाची 89 टक्के अचूकतेची पडताळणी केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.