
युरिक एसिड एक टाकावू घटक आहे. जो वाढल्याने सांधेदुखी आणि सूज, संधीवात सारख्या समस्या सुरु होतात. याने क्रिस्टल किडनीत जमा होऊन किडनी स्टोनचा त्रास सुरु होतो. त्यामुळे तुम्हाला जर युरिक एसिडचा त्रास होत असेल तर काही पेय फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. कोणते ते पदार्थ ते पाहूयात…
सकाळी उठल्यानंतर नॅचरल ड्रींक्स म्हणजे पाणी प्यायल्यान खूपच मदत मिळते. पाणी जास्त प्यायल्याने शरीरातील युरिक एसिड लघवी वाटे निघून जाण्यास मदत मिळते. चला तर पाहूयात युरिक एसिड कमी होण्यासाठी सकाळी काय प्यावे…
लिंबूत विटामिन्स सी भरपूर असते. ते युरिक एसिड विरघळवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच शरीरातील पीएच लेव्हल बॅलन्स होऊन एसिडीटी कमी होण्यास मदत होते.
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू रस मिसळा
यात थोडासा मध टाकावा
सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे
किडनीला डिटॉक्स करते
युरिक एसिड क्रिस्टल्स तोडण्यास मदत करते
मेटाबॉलिज्मला बूस्ट करते
सफरचंद अप्पल सायडर व्हिनेगर
सफरचंदाचे सत्व Apple Cider Vinegar शरीराला अल्कलाईन बनवते, आणि युरिक एसिडला बाहेर काढते.
एक ग्लास पाण्यात १ ते २ चमचे कच्चे अनफिल्टर्ड एप्पल सायडर विनेगर मिसळावे
यात मध मिसळून प्यावे
शरीराती सांध्यांची सूज कमी करते
पचन यंत्रणा नीट करते
चेरीचा ज्यूस ( Cherry Juice )
चेरीत एंथोसायनिन नावाची एण्टी इंफ्लेमेटरी तत्व असतात. जी युरिक एसिडसारखी काम करतात. चेरीचे ज्युस संधीवातात आराम देते.
ताज्या किंवा फ्रोजन चेरीला ब्लेंड करुन ज्यूस काढावे
साखर न मिसळता सकाळी रिकाम्या पोटी ते प्यावे
युरिक एसिडची पातळी कमी करते
संधीवातातील दुखणे आणि सूज कमी करते
यात एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असते
जास्त पाणी पित जा – दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे त्याने एसिड पातळ होऊन शरीराबाहेर पडते.
प्रोटीन कमी घ्यावे – रेड मीट, डाळी आणि राजमा सारख्या जादा प्रोटीन असलेले पदार्थ कमी खावे
एक्सरसाईज करावी- नियमित वॉकला जावे आणि योगासने करावीत