
भारतीय स्वयंपाक घरात अनेक प्रकारच्या बियांचा वापर मसाला म्हणून केला जातो. यातील अनेक बिया औषधी गुणांनी भरपूर आहेत. त्यापैकी मेथी हे असेच गुणकारी आहे. याचा वापर आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून केला जातो. आज आपण पाहाणार आहोत की जर तुम्ही सलग १४ दिवस मेथीच्या बियांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात काय बदल पाहायला मिळतील.
मेथीची बिया आणि त्याची पाने देखील आरोग्यासाठी लाभदायक आहेत. बिया आणि पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. आयुर्वेदानुसार मेथीचा स्वाद कडू असतो. मेथी उबदार असल्याने शरीरात उष्णता तयार करते. ज्यांना कफ आणि वात असेल तर नियंत्रित करते. मेथीने पित्त वाढते, त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन तूपासोबत करावे.
मेथीच्या बियात सॉल्युबल फायबर असते ते तुमच्या ब्लड शुगरला कंट्रोल करते. आणि कार्बोहायड्रेट्सचे अवशोषण प्रक्रीया संथ करते. हे डायबिटीज वा इन्सुलिन रेजिस्टेंन्सवाल्या लोकांना खूपच फायदेशीर आहे. मेथी पचन एंजाईम्सला उत्तेजित करते. त्यामुळे अपचन आणि पोट फुगणे सारख्या समस्या कमी होतात. मेथी कोलेस्ट्रॉलचे शोषण देखील रोखते.,ज्यामुळे हार्ट डिजीसचा खतरा घटतो.
वजन नियंत्रण करण्यासाठी मेथी उपयोगी आहे. कारण यात फायबर जास्त असते त्यामुळे भूक कमी होते. ब्रेस्टफिड करणाऱ्या मातांसाठी मेथी दूध वाढवण्यास सहायक असते. मेथीची पाने देखील एंटीऑक्सीडेंट्स, विटामिन्स आणि इंफ्लेमेशन कमी करणाऱ्या गुणांनी भरपूर असतात.
मेथीच्या सेवनासाठी तुम्ही रात्री एक चमचा बिया पाण्यात भितवत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या. तुम्ही बिया देखील चावून खाऊ शकता. पाण्यासोबत बिया गिळूही शकता. चावणे आवडत नसेल त्यांनी गिळाव्यात. या बियांना सलाड , करी वा डाळीत टाकू शकता. जर खुप वेळ भिजवले तर मेथीतून कोंब येतात. ते सलाड किंवा सपूमध्ये टाकू शकता. तुम्ही थोडेसे भाजलेले मेथीचे दाणे भाजी किंवा डाळीत टाकू शकता. मेथीची पाने खाल्ल्याने चांगला सुगंध आणि चव येते.
मेथीचे दाणे मर्यादित प्रमाणात खावेत. एडल्टसाठी ५ ते २० ग्रॅम पुरेसे आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा मेथी खात आहात तर कमी प्रमाणाने खाण्यास सुरुवात करावी. काही लोकांना पोटात त्रास किंवा अलर्जी असू शकते. डायबिटीजचे औषधे घेणाऱ्या लोकांनी थोडी सावधानता बाळगावी आणि मेथी शुगर एकदम कमी करु शकते.